नमो चषक लोगो अनावरण सोहळा व क्रिडा पटुंचे नाव नोंदणी शुभारंभ*

*नमो चषक लोगो अनावरण सोहळा व क्रिडा पटुंचे नाव नोंदणी शुभारंभ*
देशभरात नमो चषक च्या माध्यमातुन भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने क्रिडा प्रेमींसाठी एक पर्वणी ऊपलब्ध करुण देण्यात आली आहे. लोकनेते आ. राणाजगजितसिंहजी पाटील व भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या हस्ते नमो चषक लोगो चे अनावरण धाराशिव- कळंब व तुळजापूर विधानसाभा येथे करण्यात आले. नमो चषकातील विविध क्रिडा व सांस्कतीक स्पर्ध साठी नोंदणी करण्यास सुरवात करण्यात आली.
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने संपूर्ण धाराशिव जिल्हयातील भुम-परंडा-वाशी,  कंळब-धाराशिव, तुळजापूर, उमरगा-लोहारा या विधानसभा क्षेत्रामध्ये  गाव पातळी पासुन  क्रिकेट, फुटबॉल, बुध्दीबळ, कॅरम, कबड्डी, खो-खो, कुस्ती, धावणे, व्हॉलीबॉल, चित्रकला, रांगोळी, गीत गायन, वकृत्व स्पर्धा अशा विविध क्रिडा व सांस्कृतीक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेच्या नोंदणी दि. २९/१२/२०२३ ते १०/०१/२०२४ पर्यत असणार आहे. व प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरवात १२ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ पर्यत कार्यक्रम होणार आहेत व २७ जानेवारी रोजी बक्षीस वितरण होणार आहे.
  या लोगा अनावरण प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, लोकसभा निवडणुक प्रमुख नितीन काळे, अशोक भाऊ शिंदे, विजय आण्णा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित कव्हेकर पाटील, नेताजी पाटील, अस्मीता कांबळे, प्र.का.स  विनोद गपाट, प्रविण पाठक, सतिष बप्पा देशमुख, सरचिटणीस, इंद्रजित देवकते, प्रदिप शिंदे, मंडळाध्यक्ष अजित पिंगळे, राजभाऊ पाटील, अभय इंगळे यांच्या सह भारतीय जनता युवा मोर्चा चे पदाधीकारी, कार्यकर्ते व खेळाडु मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
हे नमो चषक लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात व माजी आ. सुजीतसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात येत आहे.  
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी सर्व खेळाडुंना या धाराशिव जिल्ह्यातील नमो चषका मधील विविध क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा असे आवाहन केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक