जिल्हा बँकेच्या मदतीसाठी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला- - - - - - - -माजी चेअरमन सुरेश बिराजदार, चेअरमन बापूराव पाटील, मधुकर मोटे यांच्यासह संचालक मंडळाचा पुढाकार

जिल्हा बँकेच्या मदतीसाठी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला
- - - - - - - -
माजी चेअरमन सुरेश बिराजदार, चेअरमन बापूराव पाटील, मधुकर मोटे यांच्यासह संचालक मंडळाचा पुढाकार 
- - - - - - - -
धाराशीव : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेस कारखान्याची भकहमीची रक्कम व भागमंडवालापोटी ची रक्कम मिळण्यासाठी
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची मुंबई येथे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी माजी चेअरमन सुरेश बिराजदार ,चेअरमन बापूराव पाटील, व्हा. चेअरमन मधुकर मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         उस्मानाबाद जिल्हा बँक मागील अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीत आसून बँकेस गत वैभव मिळून देनेसाठी जिल्हा बँकेस कारखान्याची थकहमी रक्कम, भागभांडवलापोटी ची रक्कम मिळणेसाठी  संचालक मंडळाचे मागील काळापासून वारंवार अजित दादा पवार यांची भेट घेऊन बँकेस आर्थिक मदत मिळावी या साठी प्रयत्न चालु केले होते. यासाठी तत्कालीन सहकार सचिव देवरा यांचे अध्यक्षतेखाली माजी चेअरमन सुरेश बिराजदार व सहकार आयुक्त यांचे मध्ये बैठक होऊन बँकेस मदत करणेसाठीचा सकारात्मक अहवाल अजित दादा पवार  यांचेकडे सादर झाला होता. माञ याच कालावधी मध्ये राज्यात राजकीय घडामोडी होऊन महविकास आघाडीचे सरकार गेले व बँकेस आर्थिक मदत मिळणेसाठीचा प्रस्ताव आहे त्या परिस्थितीत राहिला होता.मात्र पुनश: सुरेश बिराजदार यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री यांचे सोबत आज दि.२९ रोजी मुबई येथे भेट घेऊन बँकेस मदत मिळणेसाठी विनंती केली  आहे. यासंदर्भात हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री तानाजीराव सावंत यांना भेटून मदतीसाठी विनंती करणार आहे.
          बँक अडचणीतून बाहेर येण्यासाठी हे महत्त्वाची असून याचा सकारात्मक निर्णय झाल्यास उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेस मोठी मदत होणार आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक