*अजिंक्य संस्थेच्या वतीने ब्लँकेटचे भटक्या विमुक्तांना वाटप**आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम*

*अजिंक्य संस्थेच्या वतीने  ब्लँकेटचे भटक्या विमुक्तांना वाटप*

*आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम*
अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी ता तुळजापुर या संस्थेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील भटक्या विमुक्त बांधवांच्या पालावर वस्तीवर तांड्यावर जाऊन ब्लँकेटचे वाटप माजी मंत्री आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले.
आमदार प्रा राम शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणुन काम करत असताना जलसंधारण सारखी योजना प्रभावीपणे राबवुन महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशात जलसंधारणाच्या कामातून पुढे घेऊन जाण्यासाठीचे काम त्यांनी केले. जलसंधारण योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकर्यांना फायदा झाला. पाण्याची पातळी वाढली. नदी ओढे नाले, तलाव यांचे खोलीकरण करण्यात आले. यामुळे शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आमदार  प्रा. राम शिंदे साहेब हे संघर्ष करुन स्वकृत्वावर पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवुन भटक्या विमुक्त समाजातील बांधवांच्या पालावर वस्तीवर तांड्यावर जाऊन निराधार गरजु लोकांना जाऊन ब्लँकेटचे वाटप अजिंक्य संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.
अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील भटकंती करणार्या समाजाला आजही स्वातंत्र्यानंतर न्याय मिळाला नाही. आजही आज या गावाला उद्या त्या गावाला अशी व्यवसाया साठी आपली उपजीविका भागविण्यासाठी भटकंती करावी लागते. हा समाज बांधवांना पाल वस्ती करुन गावाच्या बाहेर आजही राहावे लागते. यांना घर नाही, लाईट नाही, पाणी नाही,  रस्ता नाही, नोकरी नाही,  जन्माची नोंद नाही, मुत्युची नोंद नाही, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड अशी कोणतीच कागदपत्रे नाहीत. असा समाज वर्षा नु वर्ष दुर्लक्षित राहिला आहे. अशा या समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणुन गेल्या सात वर्षांपासून अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. जो पर्यंत या समाजाला न्याय मिळणार नाही तो पर्यंत या समाजासाठी कायम लढत राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव राम जवान, प्रमोद दाणे,भारतबाई देवकर, विठ्ठल भंडारे, संतोष गायकवाड, सिध्दाराम सुरवसे यांच्या सह इतर उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक