राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सौ आशा सुरवसे राऊत तर कार्याध्यक्षपदी सौ जनाबाई कापसे यांची निवड

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सौ आशा सुरवसे राऊत तर कार्याध्यक्षपदी सौ जनाबाई कापसे यांची निवड
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सौ आशा सुरवसे राऊत तर कार्याध्यक्षपदी सौ जनाबाई कापसे यांची दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी धाराशिव येथे सर्वानुमते निवड करण्यात आली.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राज्यप्रवक्ते रोहिदास बनसोडे महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष नितीन बाप्पा शेरखाने यांच्या उपस्थितीत सदर निवड जत्रा फंक्शन हॉल धाराशिव येथे पार पडले कार्यक्रमात अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नॅशनल एक्सलन्स टीचर अवॉर्ड 2023 हा पुरस्कार मिळाला म्हणून आशा सुरवसे राऊत यांचा सत्कार करण्यात आला. 
त्यांच्या आज पर्यंतच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात केलेले योगदान लक्षात घेऊन समाजासाठी कार्य करण्यासाठी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौ कापसे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांनी समाजासाठी कार्य करावे म्हणून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे
सामाजिक बांधिलकी समजून समाजात स्त्रियांनाही तितकाच सन्मान मिळावा व त्यांनाही आपल्या बरोबरीने समाजकार्य करता यावे स्त्रियांनीही शिकावे त्यांची उन्नती व्हावी व समाज घडवण्यात त्यांचा असणारा वाटा लक्षात घेऊन फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवण्यात यावा हा उदात्त हेतू समोर ठेवून स्त्रियांची ही निवड या दिवशी अगदी जाणीवपूर्वक करण्यात आली
या निवडीमुळे समाजातील सर्व घटकातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक