सुर्डीकर भूमिपुत्रांनी जपले गावाशी असणारे भावनिक नाते**

**सुर्डीकर भूमिपुत्रांनी जपले गावाशी असणारे भावनिक नाते**
मूळचे सुर्डीचे परंतु नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या सूर्डीकर भूमिपुत्रांनी आपल्या गावाशी असणारी आपली सामाजिक बांधिलकी , येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू देऊन जपली आहे.
महेश वडगावकर ,सूर्यकांत देशमुख, अनिल बागल, विजय माने हे सर्व मूळ सुर्डी तालुका धाराशिव येथील रहिवासी. नोकरी ,व्यवसाय निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेले. आपल्या गावासाठी काही  तरी करण्याची इच्छा. योगायोगाने त्यांच्या शालेय मैत्रीण श्रीमती बबीता अंबुरे तेथीलच शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्या माध्यमातून शाळेसाठी काय करता येईल याचा विचार सुरू झाला. 
आज तोच विचार प्रत्यक्षात उतरवला.
वर्ग खोल्यांमध्ये लावण्यासाठी फॅन ,मुलांना बसण्यासाठी मोठी सतरंजी, मावशीला स्वयंपाक करताना पाणी लांबून आणावे लागत होते त्यासाठी पाईप व काही शालेय उपयोगी पुस्तके त्यांनी शाळेला सस्नेह भेट दिले. यासाठी त्यांचे मित्र अविनाश माळवदकर व सुजित अंबुरे यांनीही योगदान दिले

शाळेची स्थापना 1934 ची. गावाच्या वेशी मध्येच वेगवेगळ्या तीन ठिकाणच्या खोल्यांमध्ये इयत्ता सातवी पर्यंत शाळा भरते. विद्यार्थी संख्या 92.
जास्तीच्या सुविधा नसल्याकारणाने बऱ्याच पालकांचा ओढा शहराकडे, मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली गेल्या वर्षी पाचवी स्कॉलरशिप मध्ये चार मुलांनी शिष्यवृत्ती धारण केली, मुलांना खेळण्यासाठी किंवा प्रार्थना म्हणण्यासाठी ही शाळेचे मैदान नाही. या सर्वांनी गावकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन केले व पुढील गोष्टीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ काळे मॅडम, घोडके सर गवळी सर सोनवणे सर, हनुमंतराव झांबरे उपसरपंच माळी, सुरेश बागल, बाळासाहेब देशमुख,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जाफर शेख ,पोलीस पाटील रामकृष्ण बनसोडे,व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक