अल्पंख्याक शिक्षक ,कर्मचारी सहकारी पतसंस्था धाराशिव च्या स्वतःच्या मालकीच्या कार्यालयाचे लोकार्पण*
*अल्पंख्याक शिक्षक ,कर्मचारी सहकारी पतसंस्था धाराशिव च्या स्वतःच्या मालकीच्या कार्यालयाचे लोकार्पण*
धाराशिव. अल्पसख्याक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव च्या स्वतः च्या मालकीच्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा माजी राज्यमंत्री तथा तुळजापूर चे आमदार मा राणा जगजिसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते रविवारी 24 सप्टेंबर रोजी करण्यात आले .शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हापरिषद च्या पाठीमागे भाग्यनगर येथे मोक्याची जागा घेऊन पतसंस्थेचे कार्यालय उभारण्यात आले आहे . कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार मोहोदयानी संचालक मंडळाचे कौतुक करून शुभेच्या दिल्या व आगामी काळात पतसंस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले तसेच शिक्षण क्षेत्राला उभारी देण्याचे सर्व शिक्षकांना आवाहन केले .कार्यक्रमाचे प्रस्तािविक संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बशीर तांबोळी यांनी करून संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला , सूत्रसंचालन बालाजी इतबारे यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक खिजर मोरवे यांनी मानले ,या कार्यक्रमास संचालक मालोजी वाघमारे ,बिलाल सौदागर,बागवान इलाही ,रहीम तांबोळी , खिजर मोरवे ,मारुती काळे ,मुबारक पठाण,मुमताज शेख,संचालिका तब्बसुम बागबान , शहेनाज औसेकर,शहेदबी शेख, आनिशा कदम तसेच कल्याण बेताले ,बाळासाहेब वाघमारे ,सुरेश भालेराव, अहमद सय्यद ,नागनाथ देशमुख,श्री बाबुराव कोकाटे,अंकुश गवळी ,रामदास होरे,बालाजी तांबे,इस्माईल शेख ,विशाल सुर्यवंशी,राजकुमार मेंढेकर,बाळासाहेब चिवडे,दत्ता बामनिकर,धर्माधिकारी ,श्री बोडखे, खरोद्दिन सय्यद,निजाम सय्यद ,खालील सय्यद,श्री माळी ,बब्र भोसले ,मिलिंद जानराव ,विनोद जानराव यांच्या सह असंख्य सभासद उपस्थित होते शेवटी मा . राणा दादांच्या हस्ते कार्यालयासमोर वृक्षारोन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व संचालकांनी परिश्रम घेतले