भाग्योदय महिला प्रभाग संघ ढोकी याच्या वतीने विद्यार्थी सन्मान*

*भाग्योदय महिला प्रभाग संघ ढोकी याच्या वतीने विद्यार्थी  सन्मान* 
ढोकी - उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून भाग्योदय महिला प्रभाग संघ ढोकी यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विविध शाळेच्या वतीने निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रांगोळीस्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.
     कु.आदर्श सचिन लोमटे याने निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
पटकविल्याबद्दल प्रभाग संघाच्या अध्यक्ष सविताताई गुणवंत सुतार  व प्रभाग संघाच्या व्यवस्थापक
रूपालीताई विकास शेंडगे यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले...
        तसेच श्रेया कांबळे, जिकरा शेख, दिव्या चव्हाण,अमृता भोसले, रेणुका जावळे,  साक्षी पवार,  या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान सी.आर .पी. ताई  व ग्रामसंघ पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर  ज्येष्ठ नागरीकांचा ही सत्कार करण्यात आला.
       या कार्यक्रमास प्रभाग संघ अध्यक्ष सविता गुणवंत सुतार, सचिव सोनाली दिपक शिंदे, प्रमिला हनुमंत मगर, व्यवस्थापक रूपाली विकास शेंडगे, रोहिणी धीरज सुरवसे, सी आर पी ताई प्रीती हनुमंत साळुंखे, विद्या अच्युत शिंदे, सुजाता नेताजी मोरे, कृषीसखी महानंदा भारत हाजगुडे, पशुसखी रेणुका बालाजी भुतेकर, व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक