मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी दिनाच्या एक दिवस अगोदर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असुन औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी दिनाच्या एक दिवस अगोदर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असुन औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे.
राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे अखेर जिल्हा, तालुका गाव धाराशिव झाले आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध, उस्मानाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभागाचे नाव आता धाराशिव असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सर्व शासकीय कार्यालय वरील उस्मानाबाद नावाचे सर्व बोर्ड बदलून त्यावर धाराशिव असे केले जाणार आहे यासाठी महसूल व इतर यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली आहे.