Skip to main content

अवैधरित्या गुटखा तयार करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश उमरगा पोलीसांची कामगिरी एक आरोपी जेरबंद व एकुण 48,45,500₹ चा मुद्देमाल जप्त.”

अवैधरित्या गुटखा तयार करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश उमरगा पोलीसांची कामगिरी एक आरोपी जेरबंद व एकुण 48,45,500₹ चा मुद्देमाल जप्त.”


उमरगा / प्रतिनिधी
दि.15.09.2023 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रिलायन्स पेट्रोलपंप चौरस्ता उमरगाचे पाठीमागील शेतशिवारात बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये अवेधरित्या गुटखा तयार करुन साठा करुन विक्री व्यवसाय करत आहेत अशी माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीची खात्री करुन नमुद ठिकाणी पाहणी करुन त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पारेकर, सपोनि कासार, पोउनि माने, पोलीस हावलदार घोळसगाव, बोईने, मारेकर, गायकवाड, खतीब, पोलीस नाईक- यासीन सय्यद, कावळे, राउत, कांबळे, पोलीस अमंलदार- उंबरे, मुळे, मते, भोरे, सगर, सोनटक्के, बिराजदार, व दोन पंच असे मिळून वर नमुद ठिकाणी छापा मारुन सदर ठिकाणावरुन गुटखा तयार करणारे 09 मिक्सर मशिन, गुटखा तयार करण्यासाठी लागणारे सुपारी, जर्दा, कात, सुगंधी तंबाखु व तयार पॅकींग केलेला गोवा गुटखा माल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन टाटा टेम्पो ट्रक एमएच 13 सीयु 5126 असा एकुण 48,45,500 ₹ किंमतीचा मुद्देमाल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला एका आरोपी नामे- बस्वराज दिलीप बिराजदार, वय 29 वर्षे, रा. आरोग्य नगरी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव याचे विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुरनं 514/2023 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 सह अन्न व सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 26 (2), (आय), 26(2) (आय.व्ही), 27 (3), (ई), 30(2) दंडनिय कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पारेकर, सपोनि कासार, पोउनि माने, पोलीस हावलदार घोळसगाव, बोईने, मारेकर, गायकवाड, खतीब, पोलीस नाईक- यासीन सय्यद, कावळे, राउत, कांबळे, पोलीस अमंलदार- उंबरे, मुळे, मते, भोरे, सगर, सोनटक्के, बिराजदार, यांचे पथकाने केली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक