पाच प्रयत्न अयशस्वी पण सोनेगाव तरुणाने जिद्द सोडली नाही. अखेर यशस्वी फौजी मनोज कुदळे

पाच प्रयत्न अयशस्वी पण सोनेगाव तरुणाने जिद्द सोडली नाही. 
अखेर यशस्वी फौजी मनोज कुदळे
उस्मानाबाद तालुक्यातील सोनेगाव मधील तरुण सशस्त्र राखीव दल सीआरपीएफ मध्ये सेलेक्शन झाले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील एक पोस्टमन कार्यरत आहेत. परिस्थितीशी जाण ठेवून सतत पाच वर्ष अविरतपणे प्रयत्न करून. पाच प्रयत्न अयशस्वी ठरले.  मनोज कुदळे या युवकांनी जिद्द सोडली नाही. प्रयत्नांती परमेश्वर अखेर सहाव्या संधीचे सोने झाले. केंद्रीय राखीव दल (सीआरपीएफ) मध्ये 2022 च्या परीक्षेत यशस्वीरित्या पास होऊन. सोनेगाव मध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचे काम त्यांनी केले. त्या तरुणाचे गावातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.  त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही गावातील नागरिक देत आहेत.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक