शासकीय महिला रुग्णालयाच्या शेजारील मोकळी जागा महिला रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा..*
*शासकीय महिला रुग्णालयाच्या शेजारील मोकळी जागा महिला रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा..*
उस्मानाबाद / धाराशिव:- शासकीय स्त्री रुग्णालयात स्थानिकच नव्हे तर पर जिल्ह्यातुन महिला भगिनी बाळंतपणासाठी येतात,साठ खाटांच्या रुग्णालयात दैनंदिन शेकडो गरोदर माता बाळंतपणासाठी असतात अशाही परिस्थितीत येथील डाॅक्टर, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यशस्वीपणे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतात,या रुग्णालयाच्या लगत असलेली मोकळी जागा या रुग्णालयासाठी हस्तांतरित झाली तर रुग्णालयाचा परिसर वाढुन सुसज्ज अशी ईमारत ऊभी होईल व आलेल्या उपचारासाठी महिला भगिनींची सोय होईल याकरीता जिल्हाधिकारी डॉ सचिनजी ओम्बासे साहेब यांच्या कडे मागणी केली असुन मा.जिल्हाधिकारी साहेब यासाठी सकारात्मक आहेत,रुग्णालयाकडुन देखील ही जागा मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उस्मानाबाद तात्पुरता स्वरुपात जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत चालु झाले असुन या महाविद्यालयासाठी आवश्यक जागेचा शोध चालु असुन ज्या काही जागा उपलब्ध आहेत त्यातील एकावरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची भव्य दिव्य अशी इमारत उभी राहिलच..गरज राहिल वास्तवतेची..महिला रुग्णालयासाठी रुग्णालयाच्या बाजुची मोकळी जागा मा.जिल्हाधिकारी साहेब लवकरच शासकीय महिला रुग्णालयासाठी हस्तांतरित करुन होणा-या गैरसोयी पासुन न्याय देतील.असे मत सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी व्यक्त केले.