*ऐन उन्हाळ्यात शिमल्यासारखी स्थिती, अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान*



*ऐन उन्हाळ्यात शिमल्यासारखी स्थिती, अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान*
राहुल कोरे आळणीकर 
 अवकाळीमुळे ऐन मार्च महिन्यात नद्यांना पूर आल्याचं दृश्य दिसंतय तर दुसरीकडे अजिंठा वेरुळ लेणीतील धबधबेही चक्क प्रवाहित झालेत जणू काही पावसाळा सुरु आहे.

*अकोल्यात काश्मिरसारखे दृष्य -*

अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. तालूक्यातील आस्टूल, पास्टूल, आगीचे आणि कोठारी गावांत अक्षरश: गारांचा खच पहायला मिळालाय. सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास ही गारपीट झालीय. या गारपिटीनं परिसरातील संत्रा आणि भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतासह गावात गारांच्या चादरीनं अक्षरश: काश्मिरसदृष्य चित्रं पहायला मिळालंय. सलग चार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  


*नंदुरबारमध्ये तुफान गारपीट, डोंगर रांगांवर पांढरी चादर*

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा परिसरात झालेल्या गारपिटीमुळे डोंगर रांगांवर बर्फाची पांढरी चादर दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट आणि पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठाणेपाडा परिसरात डोंगर रांगांवर बर्फाचे मोठे खच दिसून येत आहे. या परिसरात जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.  डोंगर रांगांवरील बर्फाची चादर आणि रोडच्या बाजूला लागलेला बर्फाचा खच पाहून आपण शिमला येथे आलो की काय अशी स्थिती होईल.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक