आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी एक तारखेला करण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक आंदोलन

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी एक तारखेला करण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक आंदोलन

राहुल कोरे धाराशिव 

उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेस होत नसल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्याच्या पगारी एक तारखेला करण्यात याव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दि.१३ मार्च रोजी करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन २०२२-२३ मध्ये १ तारखेला एकाही महिन्यात झालेले नाही. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी स्त्री व पुरुष निकषांचे काम १०० टक्के  उद्दिष्टानुसार करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे शासन स्तरावरून मूल्यांकन होऊन हा जिल्हा सतत पहिल्या ५ क्रमांकामध्ये राहिलेला आहे. असे असताना देखील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. तसेच फेब्रुवारीचे वेतन दि.१० मार्चपर्यंत करण्यात आलेले नाही. ते प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला करण्यात यावे या मागणीसाठी हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले असून प्रत्येक महिन्यामध्ये वेळोवेळी संघटनेद्वारे आपल्याशी संघटनेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष वारंवार भेटून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होत नसल्याने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडीअडचणी यामध्ये गृह कर्जाचे हप्ते, वैद्यकीय उपचार व शिक्षणासाठी लागणारा खर्च हा प्रत्येक महिन्यात ठरलेला असतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेत न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी वेळोवेळी आपणास निदर्शनास आणून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करण्याची कारवाई तात्काळी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबविण्यात आलेला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद मुंडे, कार्याध्यक्ष सुनील मिसाळ, सचिव संतोष शिंदे, कोषाध्यक्ष पांडुरंग पांचाळ आदीसह कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक