माझीआई

#माझीआई

माझी आई,सौ नंदा वसंत कोरे.
आईचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झाला. 
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी लग्न झाले; शिक्षण अवघे २ री!
त्या काळी लग्न लवकर लावली जायची, त्यामुळे बालपन तर गेलेच शिवाय नवीन म्हणजे सासरात आल्याने जास्ती बंधने होती. 
सुरुवातीच्या काळात गोदड़ी, कपड़े शिवुन दिवस काढले.शेतीत काम करुन दिवस काढले. 

जेव्हा माणसाचे सर्व कर्म चांगले असतात तेव्हा परमेश्वर कुठून तर मदतिचा हात देतोच, हे जे म्हणतात ते खर आहे. 

घरात एक यशस्वी आई म्हणून देखील जबाबदारी निभlवाली. 
गेल्या अनेक वर्षांत खुप गोष्टी त्यागुन स्वतःचा व्यवसाय सुरु केला, ज्यात हळू हळू यश मिळू लागले.
खूप काम केले आई ने अजूनही चालू च आहे  तिचे अविरत काम 🥺
( तु करून दाखवले ,करते आहे,  तुझ्या आई बाबाची  मान ऊंच ठेवली ) खूप आनंदाच्या आणि  दुखाच्या गोष्टी आहेत सांगणे कठीण! ती आई आहे कितीही लिहले तरी कमी आहे तिच्या साठी 🥺

आमच्या आई बाबा च गाव तेर आणि आळणी ता. व जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद), 
आमच्या आई आणि बाबा मुळे आज आम्ही (मी, माझा मोठा भाऊ आणि मोठी बहीन ) एवढं शिकु शकलो आणि मानुस म्हणून वावरु शकत आहोत, ते फ़क़्त आणि फ़क़्त त्यांच्या संस्कारामुळे! प्रत्येक आईला वाटते किं माझ्या मुलांचे शिक्षण  आणि संसार खूप मोठा आणि छान होवो
आणि आम्ही तिघे बहिण भाऊ हि आई ताठ मानेने जगेल असच राहू. 👍🙏

व्यवसाय करताना माणसे कमावने हे एक कौशल्य असते आणि यात ती पारंगत आहे.

श्री संत गोरोबा काका (गोरा कुंभार) यांच्यावर आईची अपार श्रद्धा आहे.
स्वतःच्या आईबद्दल कधी लिहिले नव्हते यामुळे आजचा हा खटाटोप!( women's day तिला काही हा day काय तो day काय tichya साठी सगळे day सारखेच हे आपल्या साठी 😍) 

आई तुला नेहमीच चांगले आरोग्य लाभो आणि नेहमी तू अशीच हसत खेळत राहो, ही ईश्वराकडे प्रार्थना💐🙏🏼🙏🏼🙏🏼 happy women's day आई ♀🌹👩

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक