जिल्हयात सर्वत्र भव्य आरोग्य मेळाव्यांचे आयोजन**तसेच फिरता दवाखान्याचे लोकार्पण सोहळा संपन्न*

                               
*जिल्हयात सर्वत्र भव्य आरोग्य मेळाव्यांचे आयोजन*
*तसेच फिरता दवाखान्याचे लोकार्पण सोहळा संपन्न*

राहुल कोरे आळणीकर

*उस्मानाबाद,दि.17(जिमाका)*:-दि.15 मार्च 2023 रोजी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या निर्देशानुसार उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मोफत भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन डॉ.सावंत यांच्या दुरदृष्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यावेळी उद्घाटनस्थळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि आरोग्य सभापती धनंजय सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती दत्ता साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि निवासी जिल्हा अधिकारी शिवकुमार स्वामी हे ही या कार्यक्रमासाठी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितीत होते. तसेच भूम व परंडा तालुक्यातील बालाजी गुंजाळ, अण्णासाहेब जाधव, मंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी सोमनाथ रेड्डी, सतीश दैन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितिन बोडके व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, तसेच इतर भूम व परंडा तालुक्याती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
       उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आयोजीत मोफत आरोग्य शिबीरात परंडा तालुक्यतील सर्व गरजु रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये एकूण 330 रुग्णांची विशेषतज्ञांमाफर्त तपासणी करुन त्यांना मोफत चाचण्या, 115 लाभार्थीची रक्त चाचणी करण्यात आली, 10 रुग्णांचा एक्स-रे काढण्यात आले, आवश्यकतेनुसार 4 रुग्णांची इ. सी. जी. करण्यात आली, प्लास्टीक सर्जरी साठी 7 रुग्ण पात्र ठरले, 113 लोकांची कॅन्सर आणि एच. आय. व्ही. साठी तपासणी करण्यात आली, आयुष्यमान कार्ड 10 लाभार्थींना वितरीत करण्यात आले, स्त्रीरोग तज्ञांमार्फत ९३ महिलांची तपासणी, बालरोगतज्ञा मार्फत 86 बालकांची तपासणी करण्यात आली व 330 रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला असून एकूण 10 रुग्ण शस्त्रक्रियासाठी पात्र ठरले असून त्यांची उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
 डॉ.सावंत यांच्या सुचने नूसार जिल्हयातील इतर सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये, आरोग्यवर्धिनी प्रा. आ. केंद्र व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे मोफत भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण 5157 रुग्णांची विशेषतज्ञांमाफर्त तपासणी करून त्यांना मोफत चाचण्या, 943 लाभार्थींची रक्त चाचणी करण्यात आली, 188 रुग्णांचा एक्स-रे काढण्यात आले, आवश्यकतेनुसार 15 रुग्णांची ई.सी.जी. करण्यात आली, प्लास्टीक सर्जरी साठी 7 रुग्ण पात्र ठरले, 352 लोकांची कॅन्सर आणि 251 रुग्णांची एच. आय. व्ही. साठी तपासणी करण्यात आली, आयुष्यमान कार्ड 90 लाभार्थींना वितरीत करण्यात आले, स्त्रीरोग तज्ञांमार्फत 344 महिलांची तपासणी, बालरोगतज्ञा मार्फत 250 बालकांची तपासणी करण्यात आली व 5164 रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच डेन्मार्क पॅटर्ननुसार मधुमेहाबाबत समुपदेशन, उपचार, उपचार- पालन करण्यात आले व मधुमेहाबाबत प्रसिध्दी फलके लावून आरोग्यशिक्षणाबाबत जनजागृतीपर लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून आवश्यकतेनुसार पुढील तपासण्या व उपचार हे संबंधित तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय धाराशिव येथे करण्यात येणार आहेत.
       स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर येथे फिरते वैद्यकिय पथक अंतर्गत कॅप्री ग्लोबल व आदित्य बिर्ला कॅपिटल फॉडेशन तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर येथे कर्करोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सास्तूर परिसरात ग्रामीण भाग जास्त असल्यामुळे कर्क रोगाच्या लाभार्थ्यांना कर्क रोगाचे निदान करण्यासाठी मुंबई, पुणे व बार्शी येथे जावे लागते. लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बार्शी येथिल नर्गिस दत्त मेमोरीअल हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी महिला व पुरुष यांची कर्करोग तपासणी करण्यात आली. याशिबीरात 336 महिलांमधून 3 संशयित महिलांना बार्शी येथे संदर्भित करण्यात आले. तसेच यापुढे ही कर्करोगाची तपासणी नियमित करण्यात येणार आहे.
        आरोग्य मंत्री यांच्या प्रयत्नातून गोरगरीब व गरजु रुग्णांसाठी "मल्टीस्पेशालिस्ट मोबाईल व्हॅन” म्हणजेच फिरता दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. "फिरते मल्टीस्पेशालिटी रुग्णालय" हे नीती आयोगाच्या प्रकल्पातून नाविन्यपूर्ण फिरते रुग्णालय जनतेच्या आरोग्य सेवेसाठी तयार करण्यात आले असून पुर्णपणे ऑटोमोटेड हॉस्पीटल असणार आहे. हा फिरता दवाखाना ग्रामीण भागात मल्टीस्पेशालीटी सुविधांची कमतरता असल्याने यात मल्टीस्पेशालीटी सुविधा उपलब्ध असल्याने व सदर रथ हा ग्रामीण भागातील गावागावात जावून आरोग्य सेवा देणार असल्याने ग्रामीण भागातील गरजु व गोरगरीब रुग्णांसाठी हे एक वरदानच ठरणार आहे. यामध्ये एक वैद्यकिय अधिकारी, एक परिचारीका, एक तंत्रज्ञ, सहाय्यक औषध निर्माता, एक रेडीओलॉजी टेक्नीशियन तसेच एक डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे. या फिरत्या मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयामुळे आरोग्याचा हा रथ धाराशिव जिल्हयातील जनतेसाठी वरदान ठरणार आहे. या फिरत्या दवाखान्यांमध्ये वैद्यकिय तपासणी, रक्त लघवी तपासणी, एक्स-रे, शस्त्रक्रिया, लसीकरण, औषध वितरण, प्रसुतीपूर्व तपासणी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत व या फिरत्या दवाखान्यांचा परंडा तालुक्यातील रुग्णांना लाभ होणार आहे.
      या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन डॉ. आनंद मोरे, प्रस्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी तर आभार प्रदर्शन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी यांनी केले.
                                   ****

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक