*वाहतुक पोलिसांच्या कामात अडथळा केल्या प्रकरणी पत्रकार आयुब शेख यांची निर्दोष मुक्तता*
राहुल कोरे धाराशिव
धाराशिव
: दि. 29/10/2018 रोजी महामार्ग पोलिस केंद्र नळदुर्ग यांचे
पथक तुळजापूर - नळदुर्ग मानेवाडी पाटी जवळ थांबुन माटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस
दाखल करीत असताना तेथे ट्रक क्र. AP 04 TW9011 हा ट्रक आला. त्यावेळी त्या ट्रकच्या चालका कडून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसुल करीत असताना नळदुर्ग येथील पत्रकार एन टी व्ही व्रत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी तथा दै बंधुप्रेम प्रतिनिधी आयुब शेख व त्यांचे सहकारी जाधवर तेथे आले व त्यांनी नमुद ट्रक चालकाला दंड भरण्यापासून परावृत्त् केले व तेथे उपस्थित असलेले पोलिस निरीक्षक सुतार यांना “ तुम्ही रोड वर कसे थांबता तुम्हाला रोडवर थांबुन वाहन धारकांना त्रास देण्याचा अधिकार नाही मी तुम्हाला बघुन घेतो अशी
धमकी दिली.त्यानुसार नळदुर्ग पोलिस स्टेशन मध्ये पत्रकार आयुब शेख व त्यांच्या सहकारी
जाधवर यांचे विरुदध् गुन्हा कलम 353 भा.द.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर
प्रकरण हे सत्र न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधिश मा.श्रीमती अंजु शेंडे यांच्या न्यायालयात
चालु होते.
आरोपी तर्फे अॅड. अमोल हणुमंतराव गुंड यांनी युक्तीवाद केला. त्यांनी पत्रकार आयुब शेख हे कर्तव्यदक्ष पत्रकार असुन, त्यांनी नळदुर्ग पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंद्याविषयी व वाहतुक पोलिसाकडुन वाहन धारकांना होत असलेल्या त्रासाबद्दल गुन्हा दाखल होण्यापुर्वी दैनिक बंधु प्रेम मध्ये बातम्या प्रसिदध् केल्या होत्या. सदर बाबींचा राग मनात धरुन त्यांच्यावर
खोटी केस केली असल्याची शक्यता में. न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली होती. सदरचा युक्तीवाद गृहीत धरुन न्यायालयाने सत्र खटला क्र. 68/20 मधुन पत्रकार आयुब शेख व त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.आरोपी तर्फे अॅड. अमोल हणुमंतराव गुंड यांनी काम पाहीले त्यांना अॅड. रत्नदिप जाधव, अॅड. सतिश येडके आणि ॲड.करण नाईकनवरे यांनी या प्रकरणात सहकार्य केले.
"लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला संबोधले जात असले तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पत्रकारिता करणे अधिक जोखीमीचे बनून राहिले आहे. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत्यक्षरित्या अंमलबजावणी होणे तितकेच महत्वाचे असल्याचे पत्रकार वर्गातून मागणी होत आली आहे आणि होत आहे, यावर जलदगतीने निर्णय घेण्यात नाही आल्यास शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडन्यात येईल"--- *दादासाहेब पंडितराव बिराजदार, तालुकाध्यक्ष,सा. संभाजी ब्रिगेड*
------//----
"डिपार्टमेंट मध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या तसेच भ्रस्टाचाराला वाव देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरावे बाळगून बातम्या प्रकाशीत करण्याचा व स्वच्छ पारदर्शक प्रशासकीय यंत्रणा निर्माण होण्याहेतूने एक पत्रकार नेहमीच समाजात जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असतो पण दरम्यान दुखावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांमार्फत खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातो.पत्रकार अयुब शेख यांच्या बातमीमुळेच जिल्ह्यातील अनेक भ्रस्टाचार उघड झाले असून अनेक बड्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. उमरगा तालुक्यातील डाक विभाअंतर्गत एक कोटी पेक्षा अधिक रकमेचा आर्थिक आपहार उघड करण्यात यश आले असून संबंधित विभागाच्या पोस्ट मास्तर सह अन्य कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तसेच उमरगा तालुक्यातील नामवंत डॉक्टराच्या काळ्या कर्तूतिचा परदाफाश झाल्याने संबंधित डॉक्टर कागदोपत्री फरार झाल्याचे दिसून येते"-- *अँड. अमोल हनुमंतराव गुंड,विधिज्ञ धाराशिव जिल्हा न्यायालय*