Skip to main content

पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीची सिरोमनियल परेडने सागंत

पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीची सिरोमनियल परेडने सागंत



पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीची सिरोमनियल परेडने सागंता
राहुल कोरे धाराशिव

उस्मानाबाद-
 विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र यांनी घेतलेल्या 2022-23 या आर्थिक वर्षातील उस्मानाबाद पोलीस दलाची तपासणीचा समारोप सिरमोनियल परेडने झाला. सदर परेडचे नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी केले. सिरमोनियल परेड मध्ये 18 अधिकारी व 240 जवान सहभागी झाले होते.

दि. 01.03.2023 ते 04.03.2023 या कालावधीत वार्षिक तपासणी दरम्यान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मलिकार्जुन प्रसन्ना यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब, पो. स्टे. ढोकी, पो. स्टे. आनंदनगर, उपविभागीय अधिकारी शहर विभाग तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय व विविध शाखाना भेटी देवून पोलीस दलाचा कामगिरीचा आढावा घेतला.

           पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मागील आठ महिन्यापासून पदभार सांभळल्यानंतर उस्मानाबाद जिल्हयात गुन्हेगारीवर नियत्रंण, अवैध धंद्यावर परिणामकारक कारवाई, गुन्हे दोषसिध्दीचे प्रमाण, मुद्देमाल निर्गतीचे प्रमाण वाढविले आहे.
   विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मलिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,एम रमेश यांचे एकंदरीत कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक