Skip to main content

ठाकरे गटाला मंत्री डॉ सावंत यांचा मोठा धक्का - जिल्हाप्रमुख गौतम लटके यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला मंत्री डॉ सावंत यांचा मोठा धक्का - जिल्हाप्रमुख गौतम लटके यांचा शिंदे गटात प्रवेश


ठाकरे गटाला मंत्री डॉ सावंत यांचा मोठा धक्का - जिल्हाप्रमुख गौतम लटके यांचा शिंदे गटात प्रवेश 

धाराशिव - 

शिवसेनेच्या ठाकरे गटाला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला असुन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गौतम लटके यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश केला.

ठाकरे गटाला गळती लागली असुन अनेक सरपंच, उपसरपंच यानंतर आता जिल्हाप्रमुख लटके यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पुणे येथे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या कार्यालयात लटके यांनी पक्ष कार्यकर्तेसह शिवसेनेत प्रवेश केला.पालकमंत्री डॉ सावंत यांच्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवत त्यांनी प्रवेश केल्याचे सांगितले. भुम परंडा मतदार संघात सध्या अनेक विकास कामे होत असुन विकासाच्या मुद्यावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. लटके यांना मानणारा एक मोठा गत मतदार संघात आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे ठाकरे गटात एकटे पडणार आहेत. 

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक