जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही आंदोलन आंदोलक मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही आंदोलन 

आंदोलक मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम
राहुल कोरे धाराशिव 

उस्मानाबाद दि.१६ (प्रतिनिधी) - राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर दि.१६ मार्च रोजी आंदोलन करण्यात आले. 

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी एन.पी.एस. रद्द करण्यात यावी, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी, पीएफआरडीए कायदा रद्द करण्यात यावा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती करण्यात याव्यात, सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या करण्यात याव्यात, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदे भरण्यासाठी असलेली बंदी हटविण्यात यावी, शिक्षक शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करण्यात याव्यात, कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचकटी रद्द करण्यात याव्यात व आठव्या वेतन आयोग स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात यावी यांसह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आले. मात्र सरकारने यावर कुठलाही तोडगा न काढल्यामुळे त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी दि.१४ मार्चपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये सरकारी, निम सरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, नगर परिषद, नगर,पालिका, महानगरपालिका, कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्यावतीने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, कृषी सहाय्यक संघटना, विस्तार अधिकारी सांख्यिकी संघटना, आयटीआय निदेशक संघटना, जि प कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर संघटना, महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य कृषी लिपिक संवर्ग संघटना, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मफुसिल लेखक संघटना, चतुर्थ श्रेणी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटना, लिपिक हक्क परिषद, मराठवाडा शिक्षक संघ, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, तंत्र शिक्षण विभाग कर्मचारी संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मोटार वाहन कर्मचारी संघटना, शिक्षण संघर्ष संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघ, पुरोगामी शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक समिती, सर्व संवर्गीय कृषी कर्मचारी संघटना, बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना, उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ व महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना आदी संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक