*धाराशिव पोलिसांची धुळवड, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीसह अनेक पोलीस रंगात न्हाऊन निघाले*

*धाराशिव पोलिसांची धुळवड, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीसह अनेक पोलीस रंगात न्हाऊन निघाले*

राहुल कोरे धाराशिव

पोलिसांवर २४ तास ताण असतो. त्यांना नेहमी अलर्ट राहावे लागते. कोणताही सण असो,त्यांना ड्युटीवर हजर राहावे लागते. रंगपंचमी दिवशी लोक रंग खेळतात आणि पोलिसाना अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्ष राहावे लागते. मग ते कधी रंग खेळणार ? रंग खेळण्याचा आनंद केव्हा लुटणार ? म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीच घुळवड साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक पोलीस रंगात न्हाऊन निघाले, इतकेच काय तर डीजेवर गाणी लावून डान्स केला , यावेळी पोलिसांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी खांद्यावर घेऊन आनंद लुटला. एरव्ही कडक शिस्तीचे वाटणारे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आज पोलीसाना जवळचे मित्र वाटले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, पोलीस निरीक्षक विजयंत जैस्वाल, स्थागुशा पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, राखीव पोलीस निरीक्षक लालताप्रसाद दुबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बारवकर, पवार, भराटे, कासार, चौधरी, निलंगेकर व मुख्यालयीन व इतर सर्व पोलीस अंमलदार हजर होते. सर्वांनी नृत्याचा आनंद लुटत धुलीवंदन साजरे केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक