शिवजल क्रांती योजनेचे चौथ्या टप्प्यातील कामही झाले सुरू...विश्वरूपा नदीच्या खोली, रुंदीकरणाचा झाला प्रारंभ
शिवजल क्रांती योजनेचे चौथ्या टप्प्यातील कामही झाले सुरू...
विश्वरूपा नदीच्या खोली, रुंदीकरणाचा झाला प्रारंभ
दुष्काळ आणि धाराशिव जिल्हा हे जणू समीकरणच झाले आहे. उन्हाळा सुरु झाला की पाण्याची टंचाई निर्माण होते व वाड्या-वस्त्या-गावांना पाणी पुरवठ्या साठी टँकर सुरु करावे लागतात. काही गावांमध्ये तर १२ महिने पाण्याचा अभाव असतो, पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना विशेषतः महिला वर्गाला मोठी पायपीट करावी लागते. जनावरांसाठी चारा छावणी सुरु करावया लागतात. यासाठी प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्या आढावा बैठकांचे सत्र सुरु होते. अस्मानी संकटावर काम करताना शासकीय यंत्रणेला मर्यादा येतात हे ओळखून परांडा, भूम व वाशी ह्या धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्याना व यवतमाळ जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे हे ओळखून नेहमी कृती वर जोर देणारा मी विकासरत्न प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठान व भैरवनाथ शुगर्स च्या माध्यमातून शिवजलक्रांतीच्या नावे नद्या - ओढे यांचे खोलीकरण - रूंदीकरण, धरण-तलावातील गाळ काढणे ही काम करण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात तब्बल ५०० किमी चे काम , दुसऱ्या टप्प्यात १५० किमी चे काम पूर्ण झाले. याची परिणीती पावसाचे पाणी वाहून जाण्या ऐवजी दहा पटीने जास्त पाणी झिरपण्यात झाली. यातूनच इथल्या शेतीला बारमाही पाणी उपलब्ध झाले शेतकऱ्यांची पीक पद्धती बदलली, एक नवे चैतन्य शेतकरी वर्गात पसरले. आता या योजनेतील चौथ्या टप्पयाच्या जलसिंचन कामांना सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात या वर्षी ६०० किमी जलसिंचन चे काम करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ आज भूम तालुक्यातील देवंग्रा ता.भूम जि. धाराशिव येथे संपन्न झाला. या कामाचा संपूर्ण आराखडा तयार असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे, एका ठराविक कालमर्यादेत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात भूम, परांडा, वाशी तालुक्यातील अलका, विश्वरूपा, उल्फा, बाणगंगा, चांदणी, रामगंगा, नळी, खैरी, सीना या नदीच्या भागात कामं झाली. यामुळे भूजल पाणी पातळी वाढली पर्यायाने सिंचनाचे क्षेत्र वाढले.
यावेळी मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत, विकासरत्न प्रा.डॉ तानाजीराव सावंत प्रतिष्ठान चे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, भुम ता.अध्यक्ष बालाजी गुंजाळ, वाशी ता.अध्यक्ष सत्यवान गपाट, युवासेना जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मांगले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, सरपंच विशाल ढगे आदि उपस्थित होते.