जिल्ह्याचे नाव पूर्ववत झाल्यामुळे श्री धारसुर मर्दिनी मातेची हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने सामुहिक आरती करण्यात आली.
जिल्ह्याचे नाव पूर्ववत झाल्यामुळे श्री धारसुर मर्दिनी मातेची हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने सामुहिक आरती करण्यात आली.
राहुल कोरे धाराशिव
हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्ह्याचे नाव पूर्ववत धाराशिव करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून जिल्हाभरात विविध स्वरूपात आंदोलने करून नामांतर ची चळवळ चालू होती. जिल्ह्याचे नाव पूर्ववत झाल्यामुळे हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाभरात जल्लोष देखील साजरा करण्यात आला होता. आता केंद्र सरकार ची धाराशिव नामकरण साठी अधिकृत परवानगी प्राप्त झाल्याने सर्व शासकीय विभागात धाराशिव नामकरण करण्यात येत आहे. त्यामुळे आज हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने धाराशिव शहरातील श्री धारसुर मर्दिनी मातेच्या मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली.
यावेळी जिल्हा संघटक परीक्षित साळुंके, सुदर्शन वाघमारे,विक्रम साळुंके, विशाल चांदणे,प्रथमेश जगदाळे,अभिजित रोंधवे,आदर्श साळुंके,सौरभ कदम, गणेश धनके, अविनाश चौगुले, श्रीकांत कुलकर्णी, सौरभ फुलसुंदर,सतिश गवंडी,अनुराग मिसाळ, नारायण पिंपळे,वैभव गवळी,प्रथमेश शिंदे,अतुल तापरे आदी उपस्थित होते.