Skip to main content

उस्मानाबाद येथे २९, ३० व ३१ मार्च रोजी गंगाधर राज्यस्तरीय करंडक नाट्य स्पर्धेचे आयोजन - विशाल शिंगाडे सलग पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण

उस्मानाबाद येथे २९, ३० व ३१ मार्च रोजी गंगाधर राज्यस्तरीय करंडक नाट्य स्पर्धेचे आयोजन - विशाल शिंगाडे सलग पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण

उस्मानाबाद येथे २९, ३० व ३१ मार्च रोजी गंगाधर राज्यस्तरीय करंडक नाट्य स्पर्धेचे आयोजन - विशाल शिंगाडे
सलग पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण
उस्मानाबाद दि.१५ (प्रतिनिधी) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने उस्मानाबाद येथे गंगाधर करंडक राज्यस्तरीय एकांकिका नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी होणार असून या स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्ष असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१५ मार्च रोजी दिली.

उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे उपस्थित होते. पुढे बोलताना शिंगाडे म्हणाले की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व नगर परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाधर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. रोहित पवार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अभिनेते मोहन जोशी, विजय कदम, सविता मालतेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
 तसेच उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील नाट्य चळवळ जतन करावी व नाट्य संस्कृती सुरू रहावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हल्ली दोन अंकी नाटक सादर करण्याचे प्रमाण खूप घटलेले आहे. मात्र या माध्यमातून सामाजिक घटनांचा वेध घेऊन तो समाजासमोर प्रकट करण्याचे हे खूप मोठे माध्यम आहे. या नाट्य स्पर्धेसाठी ३० नाट्य संघांना निमंत्रित करण्यात आले असून हा कार्यक्रम नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सादर करण्यात येणार आहे. स्पर्धकांची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने मोफत करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तरुण-तरुणी नाट्य कलाकारांनी यामध्ये प्रवेश घेण्यासाठी व या नाट्य स्पर्धा पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

या नाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या नाट्य संघास अनुक्रमे ५२ हजार, ३१ हजार व २१ हजार रुपये तर पत्रकार व प्रेक्षकांच्यावतीने विशेष उत्तेजनार्थ ११ हजार रुपये व गंगाधर करंडक चषक, प्रमाणपत्र आदी देऊन गौरविण्यात येणार आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक