राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कामगार संघटना यांच्या आंदोलनाला यश*
राहुल कोरे आळणीकर
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे मागील ०७ (सात) दिवसापासून चालू असलेल्या बहुचर्चित चक्री उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष श्री शिवाजी रामकृष्ण सावंत, कामगार संघटना अध्यक्ष शाहीर श्रीमंत गायकवाड, कामगार संघटना पतसंस्था सचिव सतीश मच्छिंद्र माळी यांच्या नेतृत्वात सुरू होते व दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष शिवाजी सावंत (माजी सैनिक), कामगार संघटना अध्यक्ष शाहीर श्रीमंत गायकवाड व कामगार पतसंस्था सचिव सतीश मच्छिंद्र माळी यांनी आक्रमकपणे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी कामगारांसह सार्वजनिक आत्मदहन करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व कामगार कल्याण अधिकारी उस्मानाबाद यांना दिली होती दरम्यान वाढता दबाव यामुळे कटारे स्पिनिंग मिल चे मालक किशोर कटारे यांनी मध्यस्थीसाठी दैनिक तरुण भारतचे उपसंपादक श्री अविनाश गायकवाड व तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्याशी संपर्क साधून श्री सावंत, गायकवाड, माळी व इतर सर्व कामगाराशी ग्रॅज्युटी रकमे देण्यासंदर्भात चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे श्री सावंत, गायकवाड व माळी यांनी कंपनी मालकाच्या चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन कंपनी कार्यालयात कंपनी मालक किशोर कटारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक), कामगार संघटनेचे अध्यक्ष शाहीर श्रीमंत गायकवाड, कामगार पतसंस्थेचे सचिव सतीश मच्छिंद्र माळी, कंपनी कामगार अनिल शिरसागर, नेताजी व्हनमाने, कुतूब पटेल, बालाजी खराबे, बाळू तांबे तसेच तामलवाडीचे ग्रामस्थ डॉक्टर गायकवाड, मुकुंद गायकवाड, तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित व कर्मचारी श्री सुरनर, शिरसाट दैनिक तरुण भारतचे उपसंपादक श्री अविनाश गायकवाड यांच्या उपस्थितासह कामगारांच्या ग्रॅज्युटीविषयी चर्चा झाली व त्यावेळी कंपनी मालक किशोर कटारे यांनी सर्व कटारे स्पिनिंग मिलच्या कामगारांची उपदानाची/ग्रॅज्युटी रक्कम सर्व अभिलेखे तपासून आज दिनांक ०७ फेब्रवारी २०२३ पासून ०४ (चार) महिन्यात एक रक्कमी देतो असे मान्य केल्यामुळे कटारे स्पिनिंग मिल समोरील आंदोलन मागे घेण्यात आले व पुढील सार्वजनिक आत्मदहनाचे आंदोलन रद्द करण्यात आले, केलेल्या आंदोलनास यश आल्यामुळे तामलवाडी परिसरातील या विषयाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत असून सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत त्याप्रसंगी शेवटी श्री सावंत यांनी कामगारांच्या सहकार्याबद्दल व सर्व मध्यस्थींचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.