*महाशिवरात्री निमित्त आळणी येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ*
आळणी-
उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे महाशिवरात्री निमित्त हरिनाम सप्ताह व शिवचरित्र वाचन याचा शुभारंभ करण्यात आला.महादेवाचा अभिषेक व विना मृदंग टाळ याची पुजा नेताजी पंढरी भांडेकर सप्तनीक यांच्या हस्ते करण्यात आली.तसेच दररोज सकाळी 4 ते 6 काकडा भजन,7 ते 9 शिवलिला अमृत ग्रंथपारायण,10 ते 11 गाथा भजन,दुपारी 2 ते 5 महिला भजन,5 ते 6 शिवचरित्र, 6 ते 7 हरिपाठ,9 ते 11हरिकिर्तन 11 ते 4 हरिजागर असा नित्यक्रमाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच या सप्ताहात ह.भ.प. अनिल महाराज महाकले सिताराम गड,ह.भ.प.पांडूरंग महाराज रेड्डी तुळजापूर,ह.भ.प.हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूर,ह.भ.प.मन्मथ महाराज उळेकर सोलापूर,अभिमन्यू महाराज घाडगे खुनेश्वर,हे.भ.प. संतोष महाराज पवार बरमगाकर,तसेच काल्याचे किर्तन गुरूवर्य ह.भ.प.महादेव महाराज तांबे आळणीकर यांचे होणार आहे.
यासप्ताहाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,ह.भ.प.ज्ञानेश्वर तांबे,सरपंच प्रमोद वीर, सुनिल माळी,धनंजय कापसे,संतोष चौगुले,शाम लावंड,राजेंद्र वीर,पप्पू कोरे, अंकुश नांदे,कुबीर निंबाळकर, धोंडीराम वीर समर्थ वीर,अतुल कुदळे,यांच्यासह आळणी व परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.