सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी "जागरूक पालक सुदृढ बालक" या योजनेचे उद्घाटन दूरदृष्टी प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी "जागरूक पालक सुदृढ बालक" या योजनेचे उद्घाटन दूरदृष्टी प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न 

या अभियानांतर्गत 0 ते 18 वर्षे वयापर्यंतची बालके व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसेच या अभियानांतर्गत आजारी बालकांना त्वरित उपचार मिळतील, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविल्या जातील, सुस्थितीत व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येईल. त्यामध्ये काही गंभीर आजार आढळल्यास त्वरित पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले जाईल. ही तपासणी प्राथमिक-माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा, अंगणवाडी, बालवाडी, बाल सुधार गृहे, सर्व अनाथाश्रम, समाज कल्याण विभागाचे वसतिगृह येथे करण्यात येईल आणि यातील प्रत्येक तपासणी तज्ञांमार्फत केली जाणार असून त्यानंतर उपचार केले जातील.

मानव जात कितीही प्रगत झाली, कितीही तंत्रज्ञानाच्या जोरावर झेप घेतली तरी आजमितीला रक्त निर्मितीचा कारखाना निर्माण करू शकलेली नाही. अपघातग्रस्तांना, प्रसूतीच्या वेळी महिलांना, व्याधीग्रस्तांना अनेकांना रक्ताची गरज निर्माण होते मात्र अनेक वेळा रक्त पेढी मध्ये आपल्याला हवे त्या रक्तगटाचे रक्त उपलब्ध नसते. अनेकदा रक्ता अभावी आपल्या प्रियजणांना आपला जीव गमवावा लागला आहे ही खेदाची बाब आहे. रक्तदान करणे हे मानवतेचे कार्य आहे. यासाठीच आज सन्माननीय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्यव्यापी "महारक्तदान शिबिराचे" देखील उद्घाटन पार पडले. या शिबिरामध्ये राज्यातील ३६६ रक्तपेढ्यांच्या माध्यमातून तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जास्तीतजास्त रक्त संकलन करण्यात येत आहे.

मागील काही महिन्यांपासून साथींच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सर्वसामान्य जनतेची होणारे असे ससेहोलपट पाहून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत "महाआरोग्य शिबिराचे" आयोजन आज ९ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले. त्याचे उद्घाटन देखील सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडले. या शिबिरामार्फत आज आभा कार्ड व आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी, नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा तज्ञांकडून तपासणी गरजेनुसार शस्त्रक्रिया, संपूर्ण आरोग्य तपासण्या व उपचार केले जाणार आहेत.

सन्माननीय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या अभियानांचा शुभारंभ आज झाला. 

यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यभरात राबविण्यात आलेल्या "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानाचे, या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाचे विशेष कौतुक केले.

यावेळी प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, आयुक्त आरोग्य सेवा धीरज कुमार, संचालक डॉ.स्वप्नील लाळे, डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड याचबरोबर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते व राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून लोकप्रतिनिधी व नागरिक, विध्यार्थी यावेळी ऑनलाइन प्रणालीद्वारे जोडले होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक