लोहारा येथे ग्रामदैवत महादेव, महाशिवरात्री यात्रे निमित्त ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोहारा येथे ग्रामदैवत महादेव, महाशिवरात्री यात्रे निमित्त ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

राहुल कोरे आळणीकर

लोहारा: 
     शहरातील ग्रामदैवत श्री. महादेवाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला शनिवारी (दि.१८) पासून सुरुवात होणार आहे. सलग ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
          पहिल्या दिवशी महादेवाची मानाची पालखी, व काटीची पारंपरिक वाद्याच्या कडकडाटात व हरिहर भजनी मंडळाचे वारकरी, व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात येणार आहे. सलग चार दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त कला, क्रिडा, धार्मिक, सांस्कृतिक, यासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना हजारो रुपयांची बक्षिसे व चषक, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. शहराचे ग्रामदैवत शंभो महादेवाची  महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा भरली नव्हती. पंरतु या वर्षी लोहारा येथील यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने २३ व्या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१८) सकाळी ९ वाजता शहरातील जगदंबा मंदिरातून मान्यवरांच्या हस्ते महादेवाची मानाची काठी व पालखीचे पुजन करून महादेवाची पालखी मिरवणूक, शोभायात्रा, हरिहर भजनी मंडळाच्या टाळ मृदुंग च्या जयघोषात व हलघी व पारंपरिक वाद्याच्या कडकडाटात काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकीचे आगमन होताच महादेवाची आरती होईल,  त्यानंतर ही पालखी मिरवणूक जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१९) सकाळी ११ : ३० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज वलांडीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप, दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास ३१ तोळे चांदीची महादेवाची पिंड जट्टे कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी १० वाजता महादेव मंदिरात महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा, रात्री ८ वाजता कब्बडी स्पर्धा, चौथ्या दिवशी मंगळवारी (दि. २१) सायंकाळी ७ वाजता भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
     तरी या कुस्ती, मॅरेथॉन, कब्बडी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य खुल्या नृत्य स्पर्धेचा तालुक्यासह परिसरातील, राज्यभरातील मल्ल, व स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक