किल्लारी कारखाना मुळी पुजन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते संपन्नकिल्लारी कारखाना आज प्रत्यक्षात सुरु झाला आणि जणू "सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला"..!!

किल्लारी कारखाना मुळी पुजन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते संपन्न
किल्लारी कारखाना आज प्रत्यक्षात सुरु झाला आणि जणू "सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला"..!!

राहुल कोरे आळणीकर 

लातूर/ शेतकरी बांधवांची १५ वर्षांची प्रतीक्षा आज फळास आली, १५ वर्षांच्या अविरत संघर्षाची आज सांगता झाली आणि मी व माझ्या हजारो शेतकरी बांधवांनी उराशी बाळगलेले १ दिव्य स्वप्न सत्यात अवतरले. हो, किल्लारी कारखान्याची चिमणी आज अखेर पेटली, कारखाना प्रत्यक्षात सुरु झाला आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्णत्वास गेला.

किल्लारी कारखान्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेले आणि ज्यांची जणू नाळच किल्लारी कारखान्याशी जोडली गेली आहे असे ज्येष्ठ माजी संचालक श्री गुंडप्पा अण्णा बिराजदार व श्री निवृत्तीराव भोसले गुरुजी या ज्येष्ठांच्या हस्ते गव्हाण व यंत्र पूजन करून ऊस गाळपास प्रत्यक्षात सुरुवात झाली. लातूर व धाराशिव जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी, किल्लारीकर व मी; आम्हा सर्वांसाठी आजचा दिवस सोन्याचा आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर २० ऑक्टोबर, २०२२ रोजी किल्लारी कारखान्यासाठी शासकीय भागभांडवल मंजूर झाले आणि श्री निळकंठेश्वराच्या आशीर्वादाने अवघ्या १११ दिवसांमध्ये कारखाना प्रत्यक्षात सुरु झाला.

१ - २ हंगामाचा अपवाद वगळता मागच्या १५ वर्षांपासून बंद असलेला आणि कोट्यवधींची देणी बाकी असलेला किल्लारी कारखाना सुरु करणं मोठ्या जिकिरीचं काम होत पण मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस, सहकार मंत्री मा श्री अतुलजी सावे व पालकमंत्री मा श्री गिरीशभाऊ महाजन यांचे भक्कम पाठबळ आणि सहकारी आमदार श्री ज्ञानराजजी चौगुले यांची तितकीच भक्कम साथ लाभल्यामुळेच हा शिवधनुष्य पेलता आला, त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. डीडीआर श्री पी आर फडणीस व श्री एस आर नाईकवाडी यांनी त्यांची सर्व अनुभवसिद्ध कौशल्ये पणाला लावून कारखाना सुरु करण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे, त्यांचे तसेच कारखाना सुरु करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतलेले इंजिनिर्स, टेक्निकल स्टाफ व कामगार यांचे आभार आणि माझ्या शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन. 

यावेळी उमरगाचे आमदार श्री ज्ञानराजजी चौगुले, संयुक्त निबंधक श्रीमती लाटकर मॅडम, डीडीआर श्री पी आर फडणीस, श्री एस आर नाईकवाडी, कारखान्याचे अनेक माजी संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक