कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयाकुष्ठरोग निर्मलनासाठी जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन
कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुया
कुष्ठरोग निर्मलनासाठी जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन
राहुल कोरे उस्मानाबाद
उस्मानाबाद,दि.24(जिमाका): राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) उस्मानाबाद यांच्या तर्फे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमातंर्गत भाई उध्दवराव पाटील प्रशाला उस्मानाबाद येथे दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने निवड झालेले ग्रमिण भागातील 24 व शहरी भागातील 06 विद्यार्थी जिल्हास्तरावर स्पर्धेकरीता उपस्थीत होते. तालुकास्तरावर निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक रुपये 800/- व्दितीय क्रमांक 500/- व तृतीय क्रमांक 400/- रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास रु.1600/- व प्रमाणपत्र, व्दितीय येणाऱ्यास रु.1000/- व प्रमाणपत्र व तृतीय येणाऱ्यास रु.800/- व प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले.
कु. साक्षी अशोक चोथवे, वर्ग 9 वी, छत्रपती शिवाजी विद्यालय ता. वाशी हिने प्रथम क्रमांक, कु. सनम नैमुदिन शेख, वर्ग 9 वी, छत्रपती शिवाजी विद्यालय ता. वाशी हिने व्दीतीय क्रमांक, कु. राधिका संभाजी, वर्ग 7 वी, भाई उध्दवराव पाटील प्रशाला, उस्मानाबाद हिने तृतीय कृमांक पटकावला
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर के. अन्सारी, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग ) तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. गंडाळ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. ए.ए.घोगरे वैद्यकिय अधिकारीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यु. आर. शिंदे अवैद्यकीय पर्यवेक्षक व आभार प्रदर्शन ए. व्ही. शेळके, अवैद्यकीय पर्यवेक्षक यांनी केले.
****