महावितरण येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्सहात साजरा.
राहुल कोरे उस्मानाबाद
दि.१९.०२.२०२३ रोजी शिवजयंती निमित्त महावितरण मधील नारीशक्तीचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. तसेच ग्राहकांना बसण्याकरिता 10 बेंच बसवण्यात आले. कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून श्री.रविंद्र पवार साहेब ( प्र.कार्यकारी अभियंता) तर
प्रमुख पाहूणे म्हणून श्री.रविंद्र महाव्दार साहेब (प्र.कार्यकारी अभियंता ),सौ.सारीका काळे ( तालूका क्रीडा अधिकारी ,तूळजापूर),सौ.निलांबरी कूलकर्णी मॅडम( अतिरीक्त कार्यकारी अभियंता ,ट्रेनिंग सेंटर संभाजीनगर), श्री. मुरलीधर हंबीरे हे लाभले तसेच कु.शिवलीला कानडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाकरिता मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.