तेरखेडा ग्रामपंचायतच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी होणार. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उपोषणाला यश

तेरखेडा ग्रामपंचायतच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी होणार. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उपोषणाला यश
राहुल कोरे आळणीकर 
तेरखेडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झालेल्या विविध गैरप्रकाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे वाशी तालुका अध्यक्ष श्री. संजय आबा खामकर यांनी वाशी पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ पासून आमरण उपोषण सुरू केले होते. आज दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते व प्रशासन यांच्यात समन्वय घडवून आणला आणि उपोषणकर्ते श्री. संजय आबा खामकर यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत तेरखेडा येथे झालेल्या कथीत गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ६ सदस्यीय समिती घटीत करून २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सदर उपोषण यशस्वी झाल्याबद्दल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष श्री. आनंद भालेराव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नेताजी जाधव, ईसाक शेख, सौ. निर्मला सुरवसे, काका जाधव, गणी मुलानी, धनाजी पात्रे, ऊस्मान शेख, लंकेश्वर, सौ. सुरेखा अडसूळ, म्हेत्रे, ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक