तुळजाभवानी मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष एम. एस देवणीकर यांचे निधन
तुळजापूर दि 16 प्रतिनिधी
तुळजाभवानी मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष उस्मानाबादचे निवृत्त जिल्हाधिकारी मच्छिंद्रनाथ सदाशिव देवणीकर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी पुणे येथे निधन झाले.
तुळजाभवानी मंदिर संस्थांचे माजी अध्यक्ष म्हणून एम एस देवणीकर यांनी 2003 पासून 4 वर्ष कामकाज पाहिले. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचे बालेवाडी पुणे येथे निधन झाले .प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी उच्च पदवी संपादन केली व सर्वप्रथम प्राध्यापक त्यानंतर महसूल सेवेत रुजू झाले अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून लातूर भूकंप पुनर्वसनात त्यांनी चांगले काम केले. नंदुरबार, बीड लातूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा केली .जालना, बीड येथे डी एस ओ पदावर त्यांनी कामकाज केले सोलापूर व पुणे येथे आयुक्त म्हणून काम केले. त्यानंतर कृषी संचालक व आरोग्य सचिव म्हणून मंत्रालयात त्यांनी सेवा बजावली. 2013 मध्ये आरोग्य सचिव पदावरून ते निवृत्त झाले . 1994 ते 1997 या काळात उस्मानाबाद जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी व 2003 ते 2007 पर्यंत जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केले. त्यांच्या पश्चा त सहा बंधू एक बहीण तीन मुले पत्नी नातवंडे असा मोठा परिवार आहे बालेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जे एस मोहिते यांचे ते बंधू आहेत.