देशातील ९३ आकाशवाणी केंद्रातून उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राला मिळाला प्रथम क्रमांक...!
राहुल कोरे उस्मानाबाद
८ ते १० फेब्रुवारी २०२३ दरम्यान पणजी इथं किसानवाणी हा कृषी कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या देशभरातील ९३ आकाशवाणी केंद्रांची आढावा बैठक झाली, या आढावा बैठकीत इतर सर्व आकाशवाणी केंद्राच्या तुलनेत उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचा किसानवाणी कार्यक्रम सर्वोत्कृष्ट ठरला, हा कार्यक्रम सौ.पल्लवी दौलत निपाणीकर आणि सहकारी निवेदिका सौ.जयमाला विजयकुमार यादव या दोघींची संयुक्त निर्मिती होता,
बैठकीसाठी आलेल्या कमिटीने या दोघींच्या कार्यक्रमाची निवड करताना किसानवाणी कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली निवेदन शैली, बॅकग्राऊंड म्युझिक, इतर आवश्यक इफेक्ट, निर्मिती मूल्य, आणि कंटेंट या सर्व बाबींचा विचार करून कार्यक्रमाचे उत्तम निर्मिती म्हणून कौतुक केले. कार्यक्रमात कंटेंट म्हणून दोघींनी आमचे सहकारी निवेदक श्री.संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत तसच इतर आणखी तीन वेगवेगळ्या उपयुक्त माहिती विषयांचा समावेश केला होता.. या सर्वातूनच कार्यक्रम देशपातळीवर नावाजला गेला.
या दोघींनी कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक म्हणून आज आकाशवाणी उस्मानाबाद केंद्राचे नियमित श्रोते, आमचे कौटुंबिक स्नेही मित्र श्री.रवी निंबाळकर सर आणि श्री.राजाभाऊ ढवळे यांनी या कार्यक्रमाचे सादरकर्ते, मार्गदर्शक, आणि कार्यक्रम विभाग प्रमुख श्री.उन्मेष वाळिम्बे सर तसच आम्हा सर्व किसानवाणी निवेदक मंडळींना कायम सपोर्ट करणारे प्रसारण अधिकारी श्री.कृष्णा शिंदे सर आणि या विजेत्या कार्यक्रमाच्या निवेदिका सौ.जयमाला यादव आणि सौ.पल्लवी निपाणीकर यांचा सन्मान केला..
या दोघी निवेदिकांना पुढील वाटचालीस मनस्वी