१७७ शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्जमुक्ती योजनेचा लाभत दिला नाही
राहुल कोरे धाराशिव
उस्मानाबाद दि.२७ (प्रतिनिधी) - नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी शासनाने महात्मा फुले जोतिराव कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १७७ शेतकऱ्यांना आजपर्यंत या योजनेचा लाभच दिला नसल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भारत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२७ फेब्रुवारी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजनेअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील १७७ लाभार्थी शेतकऱ्यांना लाभच दिलेला नाही. विशेष म्हणजे त्या सर्व शेतकरी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले आहे. तरी देखील एकाही शेतकऱ्यास या योजनेच्या अंतर्गत रक्कम वाटप करण्यात आलेली नाही. ही रक्कम मिळावी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शेतकरी गेल्या चार महिन्यापासून हेलपाटे मारीत आहेत. तर बँकेचे अधिकारी या शेतकऱ्यांना शासनाकडून रक्कम आलेली नाही असे सांगत आहेत त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा शेतकरी उपोषणाचे मार्ग अवलंबतील असा इशारा देण्यात आला आहे.
यावे संदीप पाटील, महेश पाटील ,आमोल पाटील ,रंगनाथ माळी ,शिवाजी पवार ,राम पाटील ,जयचंद माळी, उद्धव कुलकणी, मलीआजुन पाटील,बाबा कोळी ,शिवाजी घोडके आदी