जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने अध्यक्ष मिलिंद पाटील यांचा सत्कार
राहुल कोरे आळणीकर
उस्मानाबाद दि.१४ (प्रतिनिधी) - येथील ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद पाटील यांची गोवा व महाराष्ट्र बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने मानपत्र, शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन येथोचित दि.१४ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य न्यायाधीश अंजू शेंडे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे ॲड. अध्यक्ष सुधाकर मुंडे, ॲड. राम गरड, प्रबंधक लोकरे, ॲड. देशमुख, ॲड. पी.एम. नळेगावकर, ॲड. शशिकांत निंबाळकर, ॲड. सुर्यवंशी, ॲड. व्यंकटराव गुंड, ॲड. नितीन भोसले, ॲड. व्हटकर, ॲड.खडेराव चौरे, ॲड. बागल आधी सह सर्व विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील यांनी जिल्ह्यामध्ये कामगार, सहकार, औद्योगिक न्यायालय आणण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच नवोदित वकिलांसाठी भत्ता तर मृत्यू पावलेल्या वकिलांसाठी तसेच वयाची ४० वर्षे पूर्ण करून निवृत्त झालेल्या वकिलांसाठी १० लाख रुपये निवृत्ती वेतन संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. यावेळी साहेब,ॲड.राम ग्रँड ,ॲड.अविनाश देशमुख ,ॲड.रविंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.प्रितीश उंबरे यांनी केले व उपस्थितांचे आभार विधीज्ञ मोरे यांनी मांडले.