राजकीय कटुता संपणार ? निमित्त शिवाजी महाराज जयंतीचे - मंत्री तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या सोबत उंचावले हात, शिवसेनिकात आनंद पंरतु सत्तेत आसनाराची वाढली डोखेदुखी आमदार खासदार यांना सांवत पाठबळ देणार का ?


राजकीय कटुता संपणार ? निमित्त शिवाजी महाराज जयंतीचे - मंत्री तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या सोबत उंचावले हात, शिवसेनिकात आनंद पंरतु सत्तेत  आसनाराची वाढली डोखेदुखी आमदार खासदार यांना सांवत पाठबळ देणार का ?

सत्तेत नसणाऱ्याची कटुता संपणार का? की सत्तेत असणाऱ्याची असंतोष उफाळून येणार.....

(राहुल कोरे उस्मानाबाद )

उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मुख्य कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना जवळ केले, त्यां दोघांच्या खांद्यावर हात टाकत हात उंचावून घोषणा दिल्या. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर मंत्री सावंत व खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांच्यात दुरावा व अबोला होता तो आज काही अंशी दूर झाला. मंत्री सावंत व ठाकरे गटाचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्यात सुरुवातीला मधुर राजकीय संबंध होते मात्र शिवसेना फुटल्यानंतर अबोला होता.

गेल्या आठवड्यात भाजप आमदार राणा पाटील यांनी मंत्री सावंत यांच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधीच्या असमतोलतेबाबत लेखी तक्रार केल्यानंतर दोघात दरी पडली होती. त्यातच आमदार राणा यांचे परंपरागत राजकीय विरोधक खासदार ओमराजे व पाटील यांच्यासोबत सावंत यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळीक वाढवली. सावंत यांनी समय सूचकता दाखवीत सूचक संदेश दिला.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक