तुळजापूर येथे *“मराठवाडा श्री (भवानी श्री) - २०२३”* शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न.
राहुल कोरे आळणीकर
तुळजापूर येथे प्रतिक रोचकरी यांच्या वाढदिवसा निमित्त तुळजापूर येथे *“मराठवाडा श्री (भवानी श्री) - २०२३”* शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण मराठवाडा विभागातून जवळपास 70 ते 80 मल्ल खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
आजच्या डिजिटल युगामध्ये किंवा स्पर्धा युगामध्ये युवकांचे शरीराकडे होणारे दुर्लक्ष ही अतिशय गंभीर समस्या बनत चालली आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम राबवत सर्वांच्या अयोग्याला व शरीर यष्टीला चालना देण्यासाठी असा कार्यक्रम युवासेना,टायगर ग्रुप व बप्पाराज मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धक खेळाडूंचे, कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व मान्यवरांचे तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे मी मनापासून आभार मानतो.
आपलाच - प्रतिक (बप्पा) रोचकरी
(युवासेना तालुका प्रमुख, तुळजापूर)