माता रमाई जयंतीनिमित्त शाहीर वनकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन
संपादक राहुल कोरे आळणीकर
उस्मानाबाद दि.१ (प्रतिनिधी) -माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शाहीर अनिरुद्ध वनकर यांची रमाईची गाणी आणि अनिरुद्धची वाणी हा कार्यक्रम दि.६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
उस्मानाबाद येथील रमाई महोत्सव जम्बुद्वीप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अंतर्गत रमाई फाउंडेशनच्यावतीने प्रबोधनकार, दिग्दर्शक व गायक अनिरुद्ध वनकर यांची दि.६ फेब्रुवारी रोजी लेडीज क्लबच्या मैदानावर रमाईची गाणी आणि अनिरुद्धची वाणी हा गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तर दि.७ फेब्रुवारी रोजी माता रमाई यांच्या प्रतिमेची व सोबत संविधान पुस्तके, महामानवांची वेशभूषा व बालक लेझीम पथक यांची यात्रा जम्बुद्वीप बुद्ध विहार बौद्ध नगर येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, उपाध्यक्ष राहुल वाघमारे, अरुण बनसोडे, यु.व्ही. माने, दिलीप वाघमारे, सुनील बनसोडे, विधीज्ञ सुदेश माळाळे, रावसाहेब शिंगाडे, ए.एस. सरवदे, सुनील बनसोडे, शांतिनाथ शेरखाने, दीपक सरवदे, श्रीकांत माळाळे, पी.के. बनसोडे, विजय गायकवाड, बाबासाहेब जानराव व सुशांत सोनवणे यांनी केले आहे.
.