परंडा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या पॅनलचे वर्चस्व

परंडा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या पॅनलचे वर्चस्व
राहुल कोरे उस्मानाबाद

परंडा : येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या बाणगंगा शेतकरी विकास पॅनल चा पराभव करीत विजय मिळविला आहे,विजयाची घोषणा होताच ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडत विजयी जल्लोष केला. परंडा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या १३ जागांसाठी रविवार दि२६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद कन्या शाळेत सकाळी ८ वा.पासुन दु. ४ वा. पर्यंत मतदान घेण्यात आले. यावेळी एकुण १९७५ मतदारांपैकी १३६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


मतदानानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी करण्यात आली. यामध्ये संस्थेच्या सर्वसाधारण खातेदार विभागातून उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे अशोक खैरे यांना ७४२, कालीदास खैरे यांना ७२२,अब्दुल पटेल यांना ७०१, लक्ष्मण गरड यांना ६९४, अनिल शिंदे यांना ६९२, खलील पठाण यांना ६८७, विनोद गावडे यांना ६८१, लक्ष्मण होरे यांना ६८१ तसेच महिला राखीव मतदार संघातून गंगूबाई राजेश गायकवाड यांना ७६० व झुंबरबाई मधूकर जाधव यांना ७०२, इतर मागासवर्गीय मतदार संघातून मैनुद्दीन तुटके यांना ७६०, अनुसुचित जाती जमाती मतदारसंघातुन नाना शिंदे यांना ७६४ तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून सुधाकर गायकवाड यांनी सर्वात जास्त ७८४ मते प्राप्त करून जवळपास २०० ते ३०० मताधिक्य घेऊन विजय संपादीत केला.


माजी आमदार पाटील यांच्या पॅनलचा विजय झाल्याने युवा नेते रणजीत पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करत छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा प्रमुख प्रा. गौतम लटके, तालूकाप्रमुख मेघराज पाटील, शहरप्रमुख इरफान शेख, युवा सेना प्रमुख कुणाल जाधव, डॉ. अब्बास मुजावर, मकरंद जोशी, बुद्धीवान लटके, तुकाराम गायकवाड, रईस मुजावर, संतोष गायकवाड, प्रशांत गायकवाड, अंकुश डांगे, बुध्दीवान गोडगे, दिपक गायकवाड, किरण शिंदे, समीर पठाण (एस के ), लतीफ कुरेशी, आझहर शेख, रविकीरण चैतन्य, विकास साळुंके, ओंकार काशीद यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते सचिन गायकवाड, दादा काळे, विजय जाधव, किरण काकडे, अंकुश होरे, अनिल काकडे, दादा होरे, समाधान होरे, विशाल शिंदे, तानाजी होरे, विनोद काकडे, इंद्राजित होरे, रूपेश काळे, सुधिर काळे, महारूद्र खबाले यांसह शेकडो कार्यकर्तेनी आनंदोत्सव साजरा केला.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक