उस्मानाबादेत शंभूराजे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दीदुसर्‍या दिवशी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन : जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद

उस्मानाबादेत शंभूराजे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

दुसर्‍या दिवशी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन : जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद
राहुल कोरे आळणीकर 
उस्मानाबाद ः प्रतिनिधी
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती निमित्त 11 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.12) रोजी प्रा. नितीन बानगुडे-पाटील लिखीत शंभूराजे महानाट्याचा  शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हे महानाट्य सलग तीन दिवस नागरिकांना मोफत पहायला मिळत आहे.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या जवळील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी 6 वाजता शंभूराजे महानाट्याचे उद्घाटन झाले. यावेळी विश्वास शिंदे, धीरज पाटील, संजय पाटील दूधगावकर, अभिजीत चव्हाण, आशिष मोदानी, प्रदीप मुंडे, शरद मुंडे, भाई अमरसिंह देशमुख, मसूद शेख, रोहित निंबाळकर, रवींद्र केसकर, आदित्य गोरे, अक्षय ढोबळे, अग्निवेश शिंदे, आदी यावेळी उपस्थित होते. शंभूराजे महानाट्य हे सोमवारीही नागरिकांना मोफत पहायला मिळणार आहे. रविवारी दुसर्‍या दिवशीही कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिक, विविध शाळा,  विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक एलईडी व लेजर लाईटींग शोचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, भाजपा ज्येष्ठ नेते अ‍ॅड. मिलींद पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके आदींची उपस्थिती राहणार आहे. 15 फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची उपस्थिती राहणार आहे.

छाया राहुल कोरे आळणीकर

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक