उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सचिव गौसभाई तांबोळी व त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

उस्मानाबाद  शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सचिव गौसभाई तांबोळी व त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

राहुल कोरे उस्मानाबाद 

हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून,आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलासदादा पाटील व संपर्कप्रमुख शंकरतात्या बोरकर यांचे मार्गदर्शनानुसार आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे,नगरसेवक रवि वाघमारे, नगरसेवक प्रदिप घोणे, बाळासाहेब काकडे,शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण,गटनेते सोमनाथ गुरव ,शहर उपप्रमुख बंडु आदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव तथा टायगर सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गौसभाई तांबोळी यांच्यासह त्यांचे सहकारी बाबा शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष निजाम नदाफ, मोईन तांबोळी, खाँजा कुरेशी, आसेफ तांबोळी, इम्रान तांबोळी, मोबीन तांबोळी, रणजित गोरे, आमिन तांबोळी, रेहान तांबोळी यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पंकज पाटील, महेश देवकते, कलीम कुरेशी, छोटा साजिद, शाहबाज पठाण, सत्यजित पडवळ,  अजय नाईकवाडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांनी गौसभाई तांबोळी यांचे स्वागत करुन पुढील पक्षकार्यास शुभेच्छा दिल्या.
    या पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन व सूत्रसंचालन शिवसैनिक दिनेश बंडगर यांनी केले .

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक