*दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटात झळकणार अभिनेत्री माधुरी पवार*

*दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटात झळकणार अभिनेत्री माधुरी पवार*

राहुल कोरे आळणीकर

महाराष्ट्राची अप्सरा अशी ओळख  असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार हिने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नृत्यबरोबरच 'रानबाजार' वेबसिरीज मधील राजकारणतील एक महत्वाकांक्षी करारी प्रेरणा सयाजीराव पाटील साने ची भूमिका सकारून माधुरी पवार ने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळवली तसेच छोटया पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' मधील 'वहिनीसाहेब' व 'देवमाणूस' मधील 'चंदा' या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
   माधुरी पावरने कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकेत 'टाईप कास्ट ' न होता आपल्या दमदार अभिनयातून आपली क्षमता सिद्ध करून अभिनयाचे धनुष्य लीलया पेलले आहे आणि त्यामुळेच तिचा प्रेक्षकवर्ग लाखोंच्या घरात आहे. मराठीसह तिने साऊथ इंडस्ट्री मध्येही पदार्पण केले आहे.
   आता माधुरी पवार च्या चाहत्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आमच्या हाती लागली असून माधुरी लेखक, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी बहुचर्चित मराठी,हिंदी सह पाच भाषांमध्ये निर्मित होत असलेल्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या भव्य ऐतिहासिक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत असल्याचे समजते. माधुरी पवार नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी मात्र आपल्याला काही काळ वाट बघावी लागणार आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक