पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते कृषी महोत्सव प्रचार रथाचा शुभारंभ
राहुल कोरे आळणीकर
उस्मानाबाद-
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजीत श्री. तुळजाभवानी कृषी महोत्सव – 2023 या प्रचार रथाचा शुभारंभ उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. सदरचा प्रचार रथ हा उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व खेडेगाव मध्ये जावून शेतकरी वर्गात जनजागृती करणार आहे.
दि.10.02.2023 ते 14.02.2023 या कालावधीत तुळजाभवानी जिल्हा क्रिडा सकुंल या ठिकाणी कृषी महोत्सावाचे आयोजन केले असुन त्यामध्ये कृषी प्रदर्शन, अधुनिक शेतीविषयक मान्यवर तज्ञांचे परीसंवाद चर्चा सत्र, शेतकरी सन्मान सभारंभ, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन असे अनेक स्टॉल उभारण्यात आले आहेत.
या महोत्सहवात सहभागी होउन शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाव्हन पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रकल्प संचालक आत्मा चे जितेंद्र शिंदे तसेच आत्मा विभागाचे तालुक्याचे अधिकारी उपस्थित होते
छाया राहुल कोरे आळणीकर