मतभेद विसरून देश समृद्ध करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर


मतभेद विसरून देश समृद्ध करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा 
 माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर 
राहुल कोरे आळणीकर 
उमरगा,
देशात काँगेसच्या वतीने भारतीय संविधानांची योग्य अमलबजावणी करून राजकीय लोकशाही जिवंत ठेवण्याचे कार्य केले असून सामाजिक आर्थिक व धार्मिक सहिष्णुता वाढविण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकात्म भावनेने काम करून आपला देश अधिक समृद्ध करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.
उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा युवक काँगेसच्या माझं गाव माझी शाखा या एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन मंगळवारी (दि सात) रोजी चाकूरकर यांच्या हस्ते दीप प्रजवलन करून करण्यात आले या वेळी ते बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, काँगेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, युवक काँग्रेसचे प्रभारी मतेंद्र सिंग, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र सह प्रभारी प्रदीप सिंघव,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील,प्रशांत ओगले, कोको भैय्या, सोंनलक्ष्मी वाघ, प्रदेश सरचिटणीस दीपालीताई ससाणे, शिवराज मोरे, गुलाबराव पाटील,आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात भांडण मिटवून दुनिया एक झाल्यास खऱ्या अर्थाने मानवाचा विकास होणार आहे. सर्व धर्म सर्व पंथ मानवतेची शिकवण देतात माणसाच्या दुराचारामुळे अनेक लढाया झाल्या आहेत.देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माणसा माणसातील भेद भाव नष्ट होणे गरजेचे आहे. समाजात गरीब श्रीमंत ही दरी वाढत चालली असून तरुणांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आर्थिक समानता आणण्यासाठी काम करावे असे पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिले असून ते आजही तंतोतंत लागु होत आहे राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मरून वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी तरूणाने पुढाकार घ्यावा गाव तेथे शाखा मोठ्या प्रमाणात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले या वेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत म्हणाले की तरुणांना जोडण्यासाठी आणि सामान्य कुटुंबातील सुख दुःखात सहभागी होऊन त्याची व्यथा जाणून त्याना मदत करण्यासाठी हे युवकांना जागृत करून घराघरात काँगेस पोंचविण्यास हे शिबीर घेतल्याचे सांगितले या वेळी बी. बी. श्रीनिवास यांचे भाषण झाले. प्रास्तविक भाषण संयोजक शरण पाटील यांनी केले माझं गाव माझी शाखा या उपक्रमातुन गावा गावातील बूथ बांधणी साठी महत्वाचे ठरणार आहे देशात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्ते मोठया प्रमाणात सहभागी होत असून प्रत्येक कार्यकर्तात चेतना निर्माण करण्यासाठी हे शिबीर होत असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमासाठी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, युवक सचिव महालिंग बाबशेट्टी, अभिजित चव्हाण, सचिव महेश देशमुख, योगेश राठोड, भैय्या निरफळ, राहुल वाघ, तनया कडगंचें, संगीता पाटील, गौस शेख, दिलीप भालेराव, प्राचार्य डॉ दिलीप गरुड, सचिन पाटील, आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे यांनी केले.

छाया राहुल कोरे आळणीकर

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक