आ. कैलास पाटील रसूलपुरा भागात शादीखानासाठी देणार १५ लाखांचा निधी
आ. कैलास पाटील रसूलपुरा भागात शादीखानासाठी देणार १५ लाखांचा निधी
आ. कैलास पाटील रसूलपुरा भागात शादीखानासाठी देणार १५ लाखांचा निधी
राहुल कोरे उस्मानाबाद
उस्मानाबाद दि.२१ (प्रतिनिधी) - शहरातील रसूलपुरा या भागामध्ये अब्दुल रसूल बाबा या दर्गाह परिसरामध्ये लग्न करण्यासाठी शादीखाना आवश्यक आहे. मात्र जागा असताना देखील लग्न सभामंडप बांधण्यासाठी निधी नसल्यामुळे अडचण येत होती. ही बाब आ. कैलास पाटील यांना आहेमद कुरेशी,रुधिर गायकवाड,शौकत शेख यांनी याची माहिती दिल्याने आमदार कैलास पाटील यांनी त्या परिसरात भेट दिली. यावेळी अब्दुल रसूल बाबा सामाजिक संस्थेचे संस्थापक अहमद कुरेशी यांनी शादीखाना बांधण्यासाठी आमदार निधीतून मदत करावी, अशी मागणी केली. यावेळी आ. पाटील यांनी तात्काळ येत्या २ दिवसांमध्ये १५ लाख रुपये निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. कैलास पाटील यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी वसुधा फड, शौकत भाई शेख, बिलाल तांबोळी, जुबेर शेख, रुधिर गायकवाड, मकबुल टकारी, करीम कुरेशी, बाबा कुरेशी, आयाज पठाण, असलम कागदे, नवनाथ डोंगरे, रणजीत एडके, महादेव थोरात, लियाकत कुरेशी, नवज्योत शिंगाडे, नागनाथ मगर, अजमत शेख आदीसह रसूलपुरा, फकिरा नगर,खिरणी मळा भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
