संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त शिंगोली तांडा, जळकोटवाडी तांडा येथे सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन !तांडा विकास आढावा बैठक घेऊन समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या.
संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त शिंगोली तांडा, जळकोटवाडी तांडा येथे सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन !तांडा विकास आढावा बैठक घेऊन समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या.
राहूल कोरे उस्मानाबाद
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती देशभरातील विविध तांडा, वस्तीवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच अनुषंगाने शिंगोली तांडा ता.धाराशिव (उस्मानाबाद) तसेच जळकोटवाडी तांडा, ता.तुळजापूर येथील जयंती उत्सवात सौ.अर्चनाताई पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेतील महिलांचे नृत्य पाहून उत्साहित होत सौ.अर्चनाताई यांनाही आभूषणे परिधान करून नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. याप्रसंगी सौ.अर्चनाताई पाटील यांनी बंजारा समाज बांधवांची तांडा विकास आढावा बैठक घेऊन समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या. तांडा वस्तीवर चांगले रस्ते व्हावेत अशी प्रामुख्याने सर्वांकडून मागणी करण्यात आली. इतरही समस्या महिलांनी मांडल्या. सर्व मागण्या आस्तेवाईकपणे ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बंजारा समाजाचे नेते तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.श्री.संजयजी राठोड यांच्या पुढाकारातून दि.१२/०२/३०२३ रोजी मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान काशी पोहरादेवी येथील विकासासाठी ५९३ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. किंबहुना सदरील विकासकामांचे भूमिपूजन देखील संपन्न झाले आहे. मागील अडीच वर्षात कोरोना काळ व राज्यात आपली सत्ता नसल्यामुळे तालुक्यातील जवळपास ५२ तांड्यांमध्ये निधीची कमतरता जाणवली. मात्र आता आपली सत्ता असल्यामुळे संत सेवालाल महाराज यांच्या साक्षीने सगळ्या तांड्यांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही सौ.अर्चनाताई पाटील यांनी दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस श्री.विलास राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.गणेश सोनटक्के, माजी पंचायत समिती सभापती सौ.रेणुकाताई इंगोले, सौ.रंजनाताई राठोड, माजी सरपंच श्री.वसंत पवार, श्री.भिवाजी इंगोले, श्री.आनंदा पवार, श्री.विनायक राठोड, श्री.प्रकाश राठोड, श्री.गोपीनाथ राठोड, श्री.शंकर राठोड, श्री.मनोज चव्हाण, श्री.श्रीमंत राठोड, श्री.भीमाशंकर राठोड, सौ.लताताई पवार, सौ.आशाताई पवार व परिसरातील रामतीर्थ, अलीयाबाद, बोरमन तांडा, मानमोडी तांडा, वसंतनगर तांडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच शिंगोली तांडा ता.धाराशिव (उस्मानाबाद) येथेही संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच सौ. योगिता राहुल शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, गोर सेना महाराष्ट्र संघटक राजाभाऊ पवार, प्रेमदास पवार, नायक राजुदास आडे, दिलीप आडे, बालाजी राठोड ,सचिन पवार, अनिल चव्हाण, दीपक घुटे, संतोष राठोड, विशाल जाधव, उत्तम चव्हाण तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.