उस्मानाबाद भारत स्काउट आणि गाईड जिल्हा मेळाव्यात छोट्या मोठ्या शालेय मुलांची धमाल
----------------------------------
राहुल कोरे उस्मानाबाद
उस्मानाबाद : उस्मानाबाद भारत स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक :22/2/2023 ते 24/2/2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा मेळाव्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुण 33 शाळेतील जवळपास 600 कब बुलबुल,स्काउट गाईड व 50 स्काउटर, गायडर यांनी उत्सपूर्तपणे भाग घेतला आहे.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. संचालन, नृत्य, समुह गीत, भव्य शेकोटी सांस्कृतिक कार्यक्रम, बिन भांड्याचा स्वयंपाक, हस्तकला कौशल्य, शारीरिक प्रात्यक्षिक, तंबू सजावट, प्रश्न मंजुशा,बेस्ट स्काउट आणि गाईड इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत या शालेय मुलांनी उत्साहाने भाग घेतला व शहरवासीयांना एक प्रकारची मेजवानी दिली. सांस्कृतिक कार्यक्रम व बिन भांड्याचा स्वयंपाक या स्पर्धा विशेष प्रेक्षकांना भुरळ घालत होत्या. या एक प्रकारच्या आनंद मेळाव्याची सुरुवात उस्मानाबाद जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गुप्ता साहेब, मा.शिक्षणाधिकरी ( माध्यमिक व प्राथमिक) श्री सुसर साहेब व सांळुके मॅडम ,डायट प्राचार्य श्री जटनुरे साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. सदर जिल्हा मेळावा उस्मानाबाद जिल्याचे स्काउट मुख्य संघटक श्री विक्रांत देशपांडे, जिल्हा संघटक श्रीमती सर्जे मॅडम, जिल्हा प्रशिक्षण स्काउट आयुक्त श्री पोतदार सर, जिल्हा गाईड प्रशिक्षण आयुक्त श्रीमती पांढरे मॅडम, जिल्हा मेळावा प्रमुख आदर्श शिक्षक श्री चौधरी सर, श्री धोंगडे सर इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. दिनांक: 16/2/2023 पासून अॅडव्हान्स पार्टी या मेळावा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटले आहेत.
या मेळाव्यात ही मुले आपल्या पालकांना सोडून तंबूत निवासी असतात ते आपली स्वत: ची सर्व कामे करतात. व व्यस्त वेळापत्रकानुसार स्पर्धेत भाग घेतात. व शिस्तबद्ध पध्दतीने तीन दिवस एकमेकांसोबत राहतात. यातून राष्ट्रीय भावना वाढीस मदत होते. या मेळाव्याचा शेवट दिनांक 24/2/2023 रोजी बक्षीस वितरण करुन समारोप होणार आहे. या समारोप कार्यक्रमात उस्मानाबाद चे पालकमंत्री नामदार श्री तानाजीरावजी सावंत साहेब, तुळजापूर चे आमदार नामदार श्री राणाजगजितसिंह साहेब इत्यादी सहभागी होवून त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. अशी माहिती मेळावा प्रसिद्धी प्रमुख स्काउटर श्री जयपाल शेरखाने सर यांनी कळवले आहे.