*हेस वेल्फेअर फाउंडेशन धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सुनील आप्पा शेरखाने यांची नियुक्ती*
राहुल कोरे उस्मानाबाद
धाराशिव :- हेस वेल्फेअर फाउंडेशन ही संस्था रजिस्टर असून सदर संस्था निती आयोग दर्पण मान्यता प्राप्त संस्था असून केंद्र व राज्य सरकार सोबत मिळून कार्य करते या संस्थेचा कारभार भारतात प्रत्येक राज्यात जिल्हा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चालू असून सदर संस्था प्रशासनाला सोबत घेऊन मिळून मिसळून भ्रष्टाचार व नशाबाजीच्या विरोधात लढा देत असून प्रत्येक राज्यात जिल्हास्तरावर जिथे रोजगारासाठी कोणतेही साधने नाहीत तिथे पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत स्किल एज्युकेशनसाठी बेरोजगार लाभार्थ्यांना जागरूक करून त्यांना योग्य ते ट्रेनिंग देऊन स्वावलंबी बनवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे धाराशिव जिल्ह्यातील सुनील आप्पा शेरखाने यांचे सामाजिक कार्य लक्ष्यात घेऊन हेस वेल्फेअर फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितेश्वरसिंग बेदी व राष्ट्रीय महासचिव अँड. नीरज भाला यांच्या अध्यक्षतेखाली समाज कार्य करण्यासाठी धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले असून त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य अधिक जोमाने करावे त्यासाठी शुभेच्छा दिला.