बोर्ड परीक्षेसाठी केंद्रा बाहेरील पर्यवेक्षक नको. मराठवाडा शिक्षक संघ उस्मानाबाद ची मागणी.

बोर्ड परीक्षेसाठी केंद्रा बाहेरील पर्यवेक्षक नको. 
मराठवाडा शिक्षक संघ उस्मानाबाद ची मागणी. 

राहुल कोरे आळणीकर 
----------------------------
उस्मानाबाद: इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जातात. उस्मानाबाद जिल्ह्यात या परीक्षा लातूर विभागीय शिक्षण मंडळ घेते. महाराष्ट्र राज्यातील व लातूर विभागातील इतर जिल्ह्यातील बोर्ड परीक्षा केंद्र संचालक त्यांना सोईस्कर असलेल्या त्यांच्या केंद्राअंतर्गत शाळेतील शिक्षकांच्या पर्यवेक्षक म्हणून नेमणूक बोर्डाच्या नियमावली नुसार करतात व सदर परीक्षा घेतात. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील 10,12 वी बोर्ड परीक्षा केंद्रा बाहेरील पर्यवेक्षकांकडून घेण्यात याव्यात असे आदेश मा. शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) उस्मानाबाद यांनी दिनांक:13/02/2023 रोजी काढले आहेत. हे आदेश बोर्ड नियमावली नुसार नसून इतर जिल्ह्यातील बोर्डकेंद्राना वेगळा न्याय व उस्मानाबाद जिल्ह्यातील बोर्ड केंद्रांना वेगळा अन्याय का ❓असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे लातूर विभागात इतर जिल्ह्यात नियमानुसार बोर्ड केंद्राअंतर्गत पर्यवेक्षक व उस्मानाबाद जिल्ह्यात मा. शिक्षणाधिकारी ( मा.) यांनी काढलेल्या आदेशानुसार केंद्रा बाहेरील पर्यवेक्षक यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील बोर्ड परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेत असंतोष निर्माण झाला आहे. मा. शिक्षणाधिकारी ( मा.) उस्मानाबाद यांनी या अगोदरही असेच शिक्षक विरोधी निर्णय घेवून 2005 पूर्वी नियुक्त पण 100%अनुदान नसलेल्या शाळेतील शिक्षकांची जी. पी. एफ. खाती बंद केली, निवड श्रेणी मंजूर करतानाही प्रशिक्षण झालेल्या तारखेपासूनच निवड श्रेणी देणे असले निर्णय करून फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षकांना वेठीस धरले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक घटकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून मराठवाडा शिक्षक संघ उस्मानाबाद या संघटनेच्या माध्यमातून मा. शिक्षणाधिकारी ( मा.) उस्मानाबाद यांना अनेक निवेदने देवून हे होणारे शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु फारसी दखल प्रशासकीय यंत्रणा घेत नसल्यामुळे सदर बोर्ड परीक्षा बाबतीत मराठवाडा शिक्षक संघांने मा. शिक्षणाधिकारी ( मा.) उस्मानाबाद मार्फतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभाग लातूर च्या विभागीय सचिव यांच्या नावाने निवेदन देऊन त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील बोर्ड केंद्रावर बाहेरील पर्यवेक्षक नको तर इतर जिल्ह्या प्रमाणे केंद्राअंतर्गत पर्यवेक्षक नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागणीची दखल विभागीय सचिव साहेबांनी घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षकांना, बोर्ड केंद्र संचालकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक