आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी


आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

(राहुल कोरेे  उस्मानाबाद)

उस्मानाबाद दि.२४ (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी ५ ते ७ टक्क्यांनी वसुली करून बांधकामात भ्रष्टाचार करीत आहेत. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून त्याची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असताना देखील त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे मनोज अंकुश खरे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दि.२४ फेब्रुवारी रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, बांधकाम विभागातील अधिकारी ५ ते ७ टक्क्यांनी वसुली करून बांधकामात भ्रष्टाचार करीत असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी दि. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी या तक्रारीच्या अनुषंगाने आठ दिवसात चौकशी करून वस्तुस्थिती अहवाल देण्याची आदेश केले. त्यानंतर थोड्या दिवसांनी खरे यांनी माहिती अधिकारातून त्या आदेशावर काय चौकशी केली ? याची माहिती घेतली असता त्या आदेशावर कोणतीच कारवाई केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उप अभियंता (बां) यांनी कार्यकारी अभियंता (बां) यांच्या आदेशावर कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे वरिष्ठान आदेशाचे पालन करणे केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच कलम १६६ नुसार लोकसेवकांनी एखाद्या व्यक्तीला नुकसान पोहोचविण्यासाठी कायद्याचे पालन करणे, कलम २१७ नुसार वृक्ष लोकांनी एखाद्या व्यक्तीला शिक्षक पासून किंवा मालमत्तेच्या जातीपासून वाचवण्यासाठी कायद्याचे पालन केल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे नोंद करून कार्यकारी अभियंत्यांनी दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेल्या आदेशाचा पुढील तपास त्वचे कशी करून त्यांच्या अधिकाराखाली झालेल्या कामाची पाहणी करून त्याचा अहवाल खरे यांना देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक